माझा आवडता प्राणी गाय निबंध मराठी | Essay on Cow in Marathi

माझा आवडता प्राणी गाय निबंध मराठी | Essay on Cow in Marathi

गाय हा पाळीव प्राणी आहे. लोक विविध फायद्यासाठी गायी त्यांच्या घरी ठेवतात. गायीला चार पाय असून त्यांचे शरीर मोठे आहे. त्याला दोन शिंगे, दोन डोळे आणि दोन कान आणि एक नाक आणि तोंड आहे. गायी हे शाकाहारी प्राणी आहेत. त्यांचा मानवजातीसाठी खूप उपयोग आहे. किंबहुना, शेतकरी आणि लोक याच उद्देशाने गाई पाळतात.

गाय हा खूप उपयोगी पशू आहे. ती आपल्याला दूध देते. तिच्या शेणाचाही बायोगॅससाठी किंवा गोव-यांसाठी उपयोग होतो. गोमूत्र औषधी असते तसेच खत म्हणूनही चांगले असते.

माणूस पूर्वी भटक्या अवस्थेत होता, तेव्हा तो शिकार करून पोट भरत असे. नंतर त्याला पशूपालन करण्याची कला अवगत झाली आणि तो गायीगुरे पाळून आपले पोट भरू लागला. मग त्याला शेतीची कला अवगत झाली तेव्हा शेतीसाठी लागणारे बैलही गाईनेच माणसाला दिले म्हणूनच हिंदू धर्मात गाईचे खूप महत्व आहे. गाईच्या पोटात तेहेतीस कोटी देव असतात अशी हिंदूधर्मीयांची श्रद्धा असते.

लहान मुलांसाठी गाईचे दूध चांगले कारण ते पचायला हलके असते. गाईचे तूपही औषधी असते.

गाईला खायला गवत लागते. तिचे दूध सकस यावे म्हणून तिला पेंड खायला घालतात.

गाईचे वासरू जर गाय असेल तर तिला कालवड म्हणतात आणि बैल असेल तर त्याला गो-हा असे म्हणतात.

गाय रंगाने पांढरी, काळी किंवा तपकिरी रंगाची असते. गाईला कपिला किंवा तांबू अशा नावाने हाक मारतात. ती स्वभावाने खूप गरीब असते.

अशी ही गाय मला खूप आवडते.

गाय फारच उपयोगी असणारा प्राणि आहे. हा एक पाळीव प्राणि आहे आणि जंगलातच आढळतो, तिला चार पाय, एक लांब शेपटी, दोन शिंग, दोन मोठ-मोठे डोळे आणि दोन मोठ-मोठे कान असतात. डोळे तर पहाण्याजोगे असतात. ती आपल्या लांब आणि दाट शेपटीचा उपयोग डास-माशा पळवून लावण्यासाठी करते. गाय अनेक रंगाच्या आढळतात. उदा, काळी, पांढरी, तपकिरी, भुरकट, लाल आणि मळकट.

गाय जगातील कोणत्याही भागात आढळते, डोंगरी गाय, गावखोरी गायीपेक्षा लहान असते. गायीचे हंबरणे देखील कानाला ऐकायला बरे वाटते. गायीचे शेण, घर-अंगण, चूल आदींना सारवून काढणे, गोवऱ्या करणे आणि वाळवून त्या जाळणे, तसेच शेतासाठी खत म्हणूनही उपयोगात आणल्या जाते. अलिकडच्या काळात गोबरगॅस म्हणूनही शेणाचा उपयोग केला जातो. तिचे कातडे देखील उपयोगी पडते.

गाईचे दूध तर अति गुणकारी असते. तसेच हलकं-समजण्यात येतं. तिच्या दुधापासून अनेक प्रकारचे पदार्थ मिठाई, दही, ताक, खीर, पनीर, आदी बनवले जाते. दूध हे स्वतःच एक परिपूर्ण भोजन आहे. आरोग्य आणि शक्तीसाठी त्याचा रोज उपयोग केला जातो. दूधाला आटवून त्याचे पाऊडर (चूर्ण) देखील केला जातो, त्याला साठवून नंतर उपयोगात आणले जाते.

भारतात गाईला पवित्र आणि पूज्य समजले जाते. तिला मातासमान समजून तिची पूजा केली जाते. गो-सेवा धर्म समजला जातो. गोदान श्रेष्ट दान समजल्या जाते. मरणारा व्यक्ती मरताना गोदान करून मरतो. गोशाला उघडून त्यात गोपालन करणे मोठ्या पूण्याईचे काम समजले जाते. गोवर्धनाच्या दिवशी गोबरला जाळून त्याची पुजा केली जाते. गोमूत्राचा औषधाप्रमाणे उपयोग केला जातो.

गाईचा बछाडा मोठा होऊनच पुढे-बैल बनतो. बैलगाडी ओढणे, नांगर चालवणे, ओझे ओढणे आदी कामासाठी त्याचा उपयोग केला जातो. आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये गाईची मोठी महिमा सांगितली आहे. गोहत्येला मोठे पाप समजले जाते. सर्व शुभप्रसंगी आपल्याकडे गोदान करणे विधी समजला जातो.

भारतात गाय पूजनीय आहे प्राचीन काळात साधू संत, ऋषिमुनी आपल्या आश्रमात गाई पाळत असत. महर्षी जाबालीने आपला शिष्य सत्यकामवर गोसेवेची जबाबदारी सोपविली होती. आणि त्यांना तोपर्यंत चारीत राहण्याचा आदेश दिला होता जो पर्यंत त्यांची संख्या दुप्पट होणार नाही. महर्षि विश्वामित्र यांच्या आयुष्यातील प्रसंग हिंदूंची गाईवरची निष्ठा आणि आपलेपणाचे प्रतीक आहेत. धर्मपरायण भारतात गाईला मातेचा दर्जा देऊन सन्मानित केले गेले आहे. कारण ती आईप्रमाणे आपले पालन करते.

गाईला चार पाय, एक लांब शेपूट असते जिने ती तिच्या पाठीवर बसणारे, पक्षी, माशा, डांस उडविते. तिला दोन मोठे-मोठे सुंदर डोळे असतात. तिचा रंग पांढरा, काळा, लाल, मातकट, असतो. खेळाच्या मैदानावर, रस्त्यावर, मोकळ्या जागी ती चरत असताना दिसते.

गाय कोणत्याही देवाचे वाहन नाही तरी पण देवाप्रमाणे तिची पूजा केली जाते. भगवान् श्रीकृष्णाबरोबर तिची पूजा केली जाते. भगवान श्रीकृष्णाच्या चित्रात गाय असते. सृष्टीची रचना करताना ब्रह्मदेवाने गाय पण निर्माण केली. मनुष्याने तिची पूजा करावी व गाईने त्या मोबदल्यात मनुष्याला दूध, तूप, दही द्यावे असा जणूं नियमच ठरला.

प्राचीन काळात घरे मातीची असत ती गाईच्या शेणाने सारवीत असत. इंधन म्हणून शेणाच्या गोवऱ्या जाळीत असत. आता गोबर गॅस वापरतात यातून धूर निघत नसल्यामुळे डोळे चांगले राहतात. खेड्यातील स्त्रिया अजूनही शेणानेच चूल सारवितात. आणि पुरुष हुक्क्यात पेटलेल्या गोवऱ्या टाकून हुक्का पितात.

गोवर्धनच्या (बसू बारस) दिवशी गाईच्या शेणाची पूजा करतात. शेणाचा उपयोग खतासाठी केला जातो. गोमूत्राचा उपयोग औषधे तयार करण्यासाठी होतो.

अनेक हिंदूंच्या घरात गाईची रोज पूजा करतात. गोग्रास काढतात व गाईला खाऊ, घालतात.

प्राचीन काळात राजा ब्राह्मणाला निरोगी गाई दान देत असे. आजही गाई दान करण्याचा प्रघात आहे. मुलीला लग्नात गाय दान दिली जाते. यज्ञ समाप्तीनंतर गोदान देतात. मोठ्या रानात गाई इतस्ततः फिरताना दिसतात. रस्त्यावर येतात त्यामुळे कित्येकदा अपघातही होतात.

शेतीच्या कामासाठी बैलांचा उपयोग केला जातो. गाईची उपयुक्तता लक्षात घेऊन सरकारने गोशाळा स्थापन करून बेवारस गायींची सोय केली पाहिजे. गाईंची कत्तल थांबविली पाहिजे.

ईश्वराकडून मिळालेले श्रेष्ठ बक्षीस ‘गाय’ आहे. भारतीय परंपरेतील पूज्य पशृंमध्ये गाईचे स्थान आहे. गाय परोपकारी असल्यामुळे, मनोकामना पूर्ण करीत असल्यामुळे तिला कामधेनू म्हणतात. परोपकारय दुहन्ति गावः” असे गाईबद्दल म्हटले आहे.

About Author:

या ब्लॉगवर तुम्हाला निबंध, भाषण, अनमोल विचार, आणि वाचण्यासाठी कथा मिळेल. तुम्हाला काही माहिती लिहायचं असेल तर तुम्ही आमच्या ब्लॉगवर लिहू शकता.

Comments

Popular posts from this blog

मुरुड जंजिरा | Murud Janjira.

सिंधुदुर्ग | Sindhudurg Fort.

Independence day | भारतीय स्वातंत्र्य दिन