माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

 

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.





मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे. हा पक्षी फार सुंदर आणि डौलदार असतो. त्याच्या डोक्यावर छानदार तुरा असतो. पण त्याचे पाय कुरूरुप व उंच असतात. मोराचा पिसारा वजनदार व लांबलचक असतो. या पिसाऱ्यातील प्रत्येक पिसावर निळे, हिरवे, जांभळे, सोनेरी असे विविध , रंग असतात. त्यामुळे प्रत्येक पिसावर डोळ्याची आकृती तयार झालेली असते. त्याची मान निळी व उंच असते.

जगभरात अनेक पक्षी व पक्षाच्या जाती आढळतात. काही पक्षी इतके सुंदर आणि मनमोहक असतात की त्याचे सौंदर्य पाहताच राहावे असे वाटते. मला देखील पक्षी पाहणे आवडते. माझा आवडता पक्षी मोर हा आहे. मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. मोर हा दिसण्यात सुंदर आणि आकर्षक असतो. त्याला जास्त उंच उडता येत नाही म्हणून तो कायम जमिनीवरच राहतो. 

निसर्गामध्ये विविध रंगांचे विविध आकारांचे खूप सुंदर-सुंदर मनोवेधक आणि डौलदार पक्षी असतात. आवाज, रंग आणि सौंदर्य याबाबतीत प्रत्येक पक्षी निराळा असतो, त्याचे वैशिष्ट्य निराळे असते. मोर हा असाच एक सुंदर व विलोभनीय पक्षी आहे.

मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. त्यांची डौलदार चाल, थुईथुई नाच पाहून सर्वच लोक त्याच्याकडे आकर्षित होतात. निळसर व उंच लकाकणारी मान आणि डोक्यावरील आकर्षक तुरा यामुळे त्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. मोराला हिरव्या, जांभळ्या, निळ्या रंगाचा मनमोहक पिसारा लाभला आहे. त्या पिसाऱ्यावरचा सुरेख डोळा मोराचे सौंदर्य वाढवतो.

कमळ निसर्गात अनेक पक्षी आहेत. पण जसा वाघ हा राष्ट्रीय प्राणी, हे राष्ट्रीय फूल तसेच मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे.

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा पक्षी त्याच्या सुंदर पिसाऱ्यामुळे आवडतो. लहान मुले स्नाच रे मोरा, आंब्याच्या वनातअशा बालगीतातून त्याच्याशी दोस्ती करतात. त्याच्या डोक्यावरील तुऱ्याने त्याची चाल ऐटदार, डौलदार वाटते तर त्याच्या उंच अशा निळ्या मानेमुळे व पिसाऱ्यामुळे तो भारदस्त वाटतो.

पावसाचे थेंब पडायला सुरुवात झाली की हा थुई थुई नाचायला लागतो. मोराच्या मादीला लांडोर म्हणतात. तो रानात राहतो. तो शाकाहारी व मांसाहारी असा मिश्रहारी पक्षी आहे. मोरा हा सरस्वतीचे वाहन म्हणून प्रसिद्ध आहे.

मोर आमच्या वनातील एक अत्यंत सुंदर, सावध, लाजाळू पण चतुर पक्षी आहे. भारत सरकारने १९६३ मध्ये जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात त्यास राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले. सौंदर्याचे हे मूर्त रूप साऱ्या भारतीयांना फार आवडते. कवी कालिदासाने त्या काळात मोराला राष्ट्रीय पक्ष्याचा दर्जा दिला होता.

मोर जेव्हा बेधुंद होऊन नाचतो तेव्हा आपली शेपटी उंचावून पंख्यासारखी पसरवितो. हे दृश्य पाहून भान हरपते. मोराचे शरीर अनेक रंगांचे असते. त्या रंगांच्या छायांचे एक अद्भुत मिश्रण असते. गळ्याचा आणि छातीचा रंग निळा असतो. गळ्याच्या निळेपणावरून संस्कृत कवी त्याला ‘नीलकंठ’ म्हणतात.


मोर सामान्यपणे पावसाळ्यात नृत्य करतो. खूप लांबून येणाऱ्यांचा आवाज तो ऐकू शकतो. उन्हाळ्यात मोर सुस्तावतात. मोर सापांना मारून खातो. मोर माणसाला त्रास देत नाही. हा सावध आणि भित्रा पक्षी आहे. सामान्यतः कळप करून रहातो. धान्य, किडे व काही भाज्या हे त्याचे अन्न होय. तो काही ऊंचीपर्यंत व अंतरापर्यंतच उडू शकतो. शत्रुपासून बचाव करण्यासाठी त्याला लांब, बारीक परंतु बळकट पाय मिळालेले आहेत. मोराच्या मादीला लांडोर असे म्हणतात. असा हा आपला राष्ट्रीय पक्षी आपल्या सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतो.

अनेक मंदिरात देवाला मोरपिसे वाहतात. सजावटीसाठी मोरपिसांना मागणी असते. फुलदाणीत ही मोरपिसे लावतात. त्याचे पंखेही बनवितात. त्याने वारा घेता येतो.

मोर किडे ,साप, उंदीर ,आळ्या यांना खाद्य म्हणून खातो. म्हणून मोराला शेतकऱ्याचा मित्र असे म्हणतात. त्यासोबतच मोर धान्य,बिया, शिजवलेले अन्न हेसुद्धा खातात. विविध फळेसुद्धा मोर खातात.

मोर नेहमी झाडावर समूहाने राहतात, मोरला जास्त उंचावर उडता येत नाही. त्यामुळे मोर नेहमी झाडावर किंवा जमिनीवर आढळतात. मोर ला प्राचीन काळापासूनच खूप महत्त्वाचे स्थान आहे कारण मोर माता सरस्वती चे आणि कार्तिक देवाचे वाहन आहे .

तसचं मोराच पिस हे भगवान श्रीकृष्णाच्या डोक्यावरती पहायला मिळते. त्यामुळे काहीजण मोराची देव समजून पूजा सुद्धा करतात. मोराचे सुंदर रूप आणि रंग पाहून मोराला पैठणी या मराठी महावस्त्रावर स्थान देण्यात आले आहे. प्राचीन काळात सुद्धा मोराची काही छायाचित्रे आढळली आहेत.

या सर्व कारणांमुळे मोराला भारत देशाचा ” राष्ट्रीय पक्षी ” म्हणून मान मिळाला आहे.तसेच सम्राट अशोक यांच्या नानांवर मोरा चे छायाचित्र आढळले. पूर्वीचे राजा महाराजे यांच्या राजवाड्यात मोर पाहायला मिळत. पूर्वीचे राजे हे मोराचे छायाचित्रास असलेल्या सिंहासनावर बसत आजच्या काळातील सिनेमांमध्ये मोर वरती  काही गाणे काढण्यात आलेली आहेत. मोराला नेहमीच बहुरंगी आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेच आपल्या भारतीय संस्कृती मध्ये मोराला खूप महत्त्वाचे स्थान आहे.

About Author:

या ब्लॉगवर तुम्हाला निबंध, भाषण, अनमोल विचार, आणि वाचण्यासाठी कथा मिळेल. तुम्हाला काही माहिती लिहायचं असेल तर तुम्ही आमच्या ब्लॉगवर लिहू शकता.



Comments

Popular posts from this blog

मुरुड जंजिरा | Murud Janjira.

सिंधुदुर्ग | Sindhudurg Fort.

Independence day | भारतीय स्वातंत्र्य दिन