आषाढी एकादशी निबंध मराठी | Aashadi Ekadhashi Nibhand Marathi.
आज आपण allmarathiinfo04 या लेखात आषाढी एकादशी निबंध मराठी मध्ये बघणार आहोत. आज या लेखात आपण आषाढी एकादशी निमित्त अतिशय सुंदर निबंध बघणार आहोत. आपल्याला शाळेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने निबंध लिहिण्यास सांगितले जाते. अशावेळी हे निबंध आपल्याला नक्कीच उपयोगी पडतील. चला तर मित्रांनो निबंधाला सुरुवात करुया.
काया ही पंढरी
आत्मा हा विठ्ठल
नांदतो केवळ पांडुरंग
!! जय जय हरी विठ्ठल !!
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे . या भूमीला संत ज्ञानेश्वर, संत नामदेव ,संत सावता माळी, संत एकनाथ ,संत तुकाराम ,संत चोखामेळा ,संत जनाबाई ,संत मुक्ताबाई यासारख्या संत परंपरेचा वारसा लाभला आहे. सर्वांमध्ये विठ्ठल सर्व समान आहेत. अशी समतेची भावना संतांनी लोकांच्या मनात रुजवली. या सर्व संतांचे व अवघ्या महाराष्ट्राचे दैवत म्हणजे पंढरपूरची विठू माऊली. आषाढ महिन्यात शुक्ल पक्षात येणारी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी होय. ही एकादशी महा एकादशी नावाने ओळखली जाते. वर्षभरात एकूण चोवीस एकादशी असतात मात्र त्यापैकी आषाढी एकादशीचे अनन्यसाधारण महत्व आहे. कारण याच एकादशीला महाराष्ट्रातील लाखो भाविक, वारकरी वारी मध्ये चालत पंढरपूरला जातात.जीवनात एकदातरी वारी अनुभवावी असे म्हटले जाते. आषाढी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते. अशी आख्यायिका आहे की आषाढी एकादशीला भगवान विष्णू शेष नागावर निद्रिस्थ होतात आणि चातुर्मासानंतर कार्तिकेय एकादशीला जागे होतात.
आषाढी एकादशीला आळंदीवरून ज्ञानेश्वरांची, देहूवरून तुकारामांची, त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची, उत्तर भारतातून संत कबीर यांची, तर पैठणवरून एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी येते .
या पालख्यांबरोबर सर्व भाविक पायी विठूनामाचा गजर करत पंढरपूरला पोहचतात. एकादशीच्या दिवशी पहाटे उठून चंद्रभागेच्या तीरी स्नान करतात. तुळस वाहून विष्णूची पूजा करतात. दर्शन घेतात विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाचे दर्शन घेतात. या दिवशी सर्व भाविक उपवास करतात.
धार्मिक मान्यता:
देवशयनी एकादशी बद्दल असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात (एक वैश्विक महासागर) शेषनागावर झोपी जातात. धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं एक वर्ष हे देवांची एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असते आणि उत्तरायण हा दिवस असतो. आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनाला सुरुवात होते. म्हणून आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा हरि शयनी एकदशी असे म्हटले जाते. यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकदशीला म्हणजेच प्रबोधनी एकादशीला जागे होतात. हा काळ चतुर्मास (चार महिने) म्हणून ओळखला जातो आणि हा पावसाळ्यासोबतच असतो. शयनी एकादशी म्हणजे चातुर्मासाची सुरुवात. या दिवशी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी उपासना आणि उपवास केले जातात.
महत्व :
भविष्योत्तर पुराणात, कृष्णाने युधिष्ठिराला शयनी एकादशीचे महत्त्व सांगितले आहे, कारण निर्माता-देव ब्रह्मदेवाने त्याचा पुत्र नारदांना एकदा त्याचे महत्त्व सांगितले होते. राजा मंडताची कथा याच संदर्भात सांगितली आहे. धर्मनिष्ठ राजाच्या देशात तीन वर्षे दुष्काळ पडला होता, परंतु राजाला पर्जन्य देवतांना प्रसन्न करण्याचा उपाय सापडला नाही. अखेरीस, अंगिरस ऋषींनी राजाला देव-शयनी एकादशीचे व्रत (व्रत) पाळण्याचा सल्ला दिला. असे केल्यावर विष्णूच्या कृपेने राज्यात पाऊस पडला.
पंढरपुर वारी:
महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात.हिलाच आषाढी वारी म्हणतात.[६] चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, एदलाबाद येथून मुक्ताबाई यांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
About Author:
Comments
Post a Comment
These website is not government he is private website.