छत्रपती शिवाजी महाराज निबंध | Chhatrapati Sivaji Maharaj Essay in Marathi

 छत्रपती शिवाजी महाराज निबंध |  Chhatrapati Sivaji Maharaj Essay in Marathi


 छत्रपती शिवाजी महाराज हे शूर, हुशार आणि दयाळू राज्यकर्ते होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी येथे मराठा कुटुंबात झाला. शिवाजींचे वडील शहाजी आणि आईचे नाव जिजाबाई असे होते. आई जिजाबाई या धार्मिक स्वभावाच्या असूनही गुण-स्वभाव आणि व्यवहारात वीर स्त्री होत्या.

 छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह 14 मे 1640 रोजी सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला. त्यांच्या मुलाचे नाव संभाजी होते. संभाजी हे शिवाजींचे ज्येष्ठ पुत्र आणि उत्तराधिकारी होते ज्यांनी 1680 ते 1689 इसवी पर्यंत राज्य केले. संभाजीच्या पत्नीचे नाव येसूबाई होते. त्यांचा मुलगा आणि वारस राजाराम होता. शिवरायांचे समर्थ गुरु  यांचे नाव भारतातील ऋषीमुनी आणि विद्वानांमध्ये प्रसिद्ध आहे.

लहानपणीच प्रजादक्ष आणि पराक्रम हे गुण शिवाजी महाराज यांच्या अंगी रुजले. माता जिजाऊ प्रमाणेच शहाजीराजे देखील वेळ मिळेल तेव्हा लहान शिवरायांना युद्धकला, घोडेबाजीचे आणि वाचन करायला शिकवीत. अशाप्रकारे आई-वडिलांच्या छत्रछायेखालीच भविष्याचा एक महान पुरुषा आणि स्वराज्य निर्मितीची इच्छा बाळगणारे छत्रपती शिवाजी महाराज मोठे होत होते.

तोरणा किल्ला जिंकून छत्रपति शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली होती.

त्यानंतर स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला अतिशय धैर्याने तोंड देऊन शिवाजी महाराज यशस्वी ठरले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे धैर्य आणि पराक्रम

” अफजलखानाचा वध” ” शाहिस्तेखानाची बोटे कापणे” या प्रसंगांमधून हा दिसून येतो.

शिवाजी महाराजांच्या पराक्रमी आणि धाडसी वृत्तीने स्वकीय शत्रूंचा देखिला धडा शिकविला. याव्यतिरिक्त पुरंदरचा तह, दिल्लीमध्ये झालेली औरंगजेबाची भेट आणि सुटका अशा बिकट परिस्थितीला देखील शिवाजी महाराजांनी संयमाने आणि धैर्याने तोंड दिले.  शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मीतीच्या लढाईमध्ये त्यांच्यासोबत होते ते म्हणजे मावळे आणि योग्य साथीदार यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले. प्रत्येक प्रसंगांमध्ये मावळे जिकरीने शिवाजी महाराजा यांच्या सोबतीला आले. शिवरायांसाठी पर्यायाने स्वराज्यासाठी स्वतःचे प्राण सुद्धा गमाविले.तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर व मुरारजी ते शूर वीर तर स्वराज्याच्या स्वप्नासाठी धरणी तीर्थ झाले.

इसवी सन 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला.

त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला एक राजा मिळाला. त्यानंतर महाराजांनी स्वराज्याचा कारभार सुरळीत आणि सुव्यवस्थित चालावा यासाठी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. स्वतंत्र स्वराज्याचे चलन चालू केले. तसेच आरमार व्यवस्था, सुयोग्य कर वसुली, गड- किल्ले सुरक्षा अशा विविध पर्यावरणीय मोहीम छत्रपती शिवाजी महाराज यांनी राबवल्या.

शिवाजी राजे असताना त्यांच्या पाठीमागे स्वराज्य सांभाळण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज घडवण्यासाठी राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांनी प्रयत्न केले आणि त्यांच्या या प्रयत्नांना यश सुद्धा आले. स्वराज्याच्या शाखा संपूर्ण दक्षिण भारतात पसरवण्यात छत्रपती शिवाजीराजे सफल झाले होते. त्यामुळे परकीय सत्तांनी सुद्धा शिवरायांचे स्वराज्य अस्तित्व मान्य केले होते. 

अखेर 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर अशा या वीर पराक्रमी युगपुरुषाची प्राणज्योत मावळली.

असा हा प्रजादक्ष राजा, राष्ट्रपुरुष शिवाजी महाराज स्वतःच्या पराक्रमाने आणि कर्तुत्वाने ” छत्रपती” म्हणून अनंत काळासाठी आपले नाव इतिहासाच्या पानावर छापून प्रत्येक मराठी माणसाच्या, महाराष्ट्राच्या माती मध्ये अजरामर झालेला आहे.


 About Author:

या ब्लॉगवर तुम्हाला निबंध, भाषण, अनमोल विचार, आणि वाचण्यासाठी कथा मिळेल. तुम्हाला काही माहिती लिहायचं असेल तर तुम्ही आमच्या ब्लॉगवर लिहू शकता.

Comments

Popular posts from this blog

मुरुड जंजिरा | Murud Janjira.

सिंधुदुर्ग | Sindhudurg Fort.

Independence day | भारतीय स्वातंत्र्य दिन