भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम मराठी निबंध। dr.APJ Abdul Kalam Marathi Eassy

भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम मराठी निबंध। dr.APJ Abdul Kalam Marathi Eassy 


डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम याचा जन्म १५ आक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडू मधील रामेश्वरम येथे मध्यम वर्गात झाला. त्याचे संपूर्ण नाव डॉ. अब्दुल पाकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे होते.  कलाम यांच्या वडीलांचे नाव जैनुलाब्दीन अब्दुल असे होते. त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना नेण्याचे-आण्याचे काम करत होते. परंतु लहान वयातच वडिलांचे छत्र हरपले . त्यावेळी त्यानी वर्तमानपत्रे विकून आणि लहान-मोठी कामे करून घरी हातभार लावला. त्याचे बालपण कठीण प्रसंगातून गेले. 

     डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी आपले प्राथमिक शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले . शाळेत असताना त्यांना गणित विषयी भरपूर आवड  होती. त्यानंतर त्यांनी तिरुपल्ली येथील सेट जोसेफ कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. कलाम यांनी भौतिक शास्त्रात बी. एस्सी पुर्ण केली. त्यानंतर त्यांनी चेन्नई मधील इस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये प्रवेश घेतला. कलाम यांना भारतीय हवाई दलात विमानाचे वैमानिक होण्याचे स्वप्न होते. 

   डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा संबंध सन १९५८ ते १९६३ संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेशी आला. कलाम यांनी भारतीय सेनेसाठी छोटे-छोटे हेलिकॉप्टर बनवण्यास सूरुवात केली. सन १९६३ मध्ये त्यांनी भारतीय अवकाश संशोधन संस्थेत क्षेपणास्त्र विकासाच्या कामामध्ये सहभागी होऊ लागले. कलाम पुन्हा इंदिरा गांधींच्या काळात क्षेपणास्त्र विकासासाठी संशोधन आणि विकास संस्थेमध्ये आले. तेव्हा पासून त्यांनी स्वदेशात सुद्धा क्षेपणास्त्र बनवायचा ध्यास घेतला. क्षेपणास्त्र विकास कार्यामधील अग्नी क्षेपणास्त्रच्या यशस्वी चाचणीमुळे कलाम यांचे संपूर्ण जगभरात कौतुक झाले. कलाम यांना स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र तयार करण्याची जिद्द तेव्हापासून होती. 

     डॉ ए पी जे अब्दुल कलाम १० जून २००२ मध्ये राष्ट्रपती पदासाठी यांचे नाव सुचवण्यात आले. काँग्रेस आहे समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने ते भारत देशाचे राष्ट्रपती बनले. ते देशाचे ११ वे राष्ट्रपती होते आणि त्यानी हे पद  २ जुलै २००२ पासून ते २५ जुलै २००७ पर्यंत निभावले. 

    डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांना अन्य पुरस्कारांनी सन्मानित केलं त्यांना सन १९८१ मध्ये पद्मभूषण सन १९९० पदमविभूषण आणि १९९७ मध्ये भारताच्या सर्वोच्च पुरस्कार "भारतरत्न" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

     स्विझर्लंड ही त्यांच्या वैज्ञानिक कामगिरीची दखल घेऊन ज्या दिवशी त्यांनी स्विझर्लंडला भेट दिली .तो दिवस विज्ञान दिवसाच्या रूपाने साजरा केला जातो. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी देशाला अवकाश क्षेत्रात पुढे नेणारे व तसेच मिसाईल आणि क्षेपणास्त्र स्वंय बनवणारे देशाच्या तरुणांना- युवकांना  देश कार्यासाठी जोडणारे विद्यार्थ्यांमध्ये रमणारे त्यांना मार्ग दाखवणारे कलाम चाचा होते. डॉक्टर कलाम हे देशाच्या युवकांसाठी सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आहे. 

   डॉ कलाम (वय ८३) २३ जुलै २०१५ रोजी हृदयविकाराच्या कारणास्तव इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ( आय आय एम) शीलांग इथे व्याख्यान देत असताना निधन झाले. रामेश्वर इथे त्यांच्या मूळ शर्यतीत पूर्ण राज्यसभेच्या स्मरणार्थ त्यांचा अंत झाला . त्यांच्या स्मरणार्थ एक स्मारक बांधण्यात येत आहे. कलाम भारतातील विद्यार्थी समुदायातील त्यांच्या प्रेरक भाषणाबद्दल आणि संवाद करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.



 About Author:

या ब्लॉगवर तुम्हाला निबंध, भाषण, अनमोल विचार, आणि वाचण्यासाठी कथा मिळेल. तुम्हाला काही माहिती लिहायचं असेल तर तुम्ही आमच्या ब्लॉगवर लिहू शकता.


Comments

Post a Comment

These website is not government he is private website.

Popular posts from this blog

मुरुड जंजिरा | Murud Janjira.

सिंधुदुर्ग | Sindhudurg Fort.

Independence day | भारतीय स्वातंत्र्य दिन