लोकमान्य बाळ गंगाधर टिळख मराठी निबंध | Lokmanya Bal Gangadhar Tilak Marathi Eassy.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळख मराठी निबंध | Lokmanya Bal Gangadhar Tilak Marathi Eassy.
allmarathiinfo04 |
लोकमान्य टिळक हे त्या स्वातंत्र्यसैनिकापैकी एक मानले जातात जे त्यांच्या लढाऊ चेतना ,विचारधारा ,धैर्य बुद्धिमत्ता आणि अटल देशभक्तीसाठी ओळखले जातात. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना लोकमान्य टिळक यांनी केली.
जन्म आणि कुटुंब:
बाळ गंगाधर टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी महाराष्ट्रात रत्नागिरीतील चिखली गावात झाला. ते जातीने ‘चितपावन’ ब्राह्मण होते. त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक संस्कृत अभ्यासक आणि लोकप्रिय शिक्षक होते. टिळक एक हुशार विद्यार्थी होते आणि गणितामध्ये खूप निपुण होते. लहानपणापासूनच टिळकंच्या मनात अन्याय करणाऱ्याबद्दल रागाची भावना होती. ते स्वभावानेही प्रामाणिक होते आणि त्यांचा सत्यावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास होता. भारताच्या त्या पहिल्या तरुणांच्या गटात त्यांचा समावेश आहे, ज्यांना आधुनिक महाविद्यालयीन शिक्षण प्राप्त झाले.
शिक्षण:
टिळक दहा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे रत्नागिरीतून पुण्यात बदली झाली. त्यामुळे टिळकांच्या जीवनात बरेच मूलभूत बदल झाले. पुण्यात त्यांनी डॉ एंग्लो-व्हर्नाक्युलर स्कूलमध्ये प्रवेश घेतला, तेथील नामांकित शिक्षकांकडून शिक्षण घेण्याची संधी त्यांना मिळाली. पुण्यात आल्यानंतर टिळकांना आईच्या निधनाचा आघात सहन करावा लागला आणि जेव्हा ते १६ वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांचाही मृत्यू झाला. तेव्हा टिळक मॅट्रिकची परीक्षा देत होते आणि त्यांचे सत्यभामा या १० वर्षीय मुलीशी लग्न झालेले होते. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला.
१८७७ मध्ये बाळ गंगाधर टिळक यांनी गणित विषयातील प्रथम श्रेणीसह कला शाखेत पदवी संपादन केली. त्यानंतरही त्यांनी शिक्षण सुरूच ठेवले आणि कायद्याच्या शिक्षणासाठी एलएलबीची परीक्षाही उत्तीर्ण केली. यानंतर टिळकांनी पुण्यातील एका खासगी शाळेत गणित शिकवण्यास सुरुवात केली.
शैक्षणिक कार्य:
त्यानंतर त्यांनी पत्रकाराची भूमिका स्वीकारली. ते पाश्चात्य शिक्षण व्यवस्थेचे कडक टीकाकार झाले आणि ते म्हणत की या शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून भारतीय विद्यार्थ्यांना दुय्यम पहिले जाते आणि हे भारताच्या अस्मितेसाठी असन्मानपूर्ण आहे. ते निष्कर्षाप्रत आले की चांगले शिक्षण दिले जाईल तेव्हाच सुनागरिक तयार होतील.
त्यांचा असा विश्वास होता की प्रत्येक भारतीयाला भारतीय संस्कृती आणि राष्ट्रीय आदर्शांचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे. युवांना उच्च संस्कारांचे शिक्षण मिळावे म्हणून टिळकांनी आपले वर्गमित्र आगरकर आणि थोर समाज सुधारक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यासमवेत ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ ची स्थापना केली.
स्वातंत्र्य चळवळीतील कार्य:
डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ स्थापनेच्या पुढच्याच वर्षी त्यांनी ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या वृत्तपत्रांचे प्रकाशन सुरू केले. ‘केसरी’ मराठी भाषेचे वृत्तपत्र होते तर ‘मराठा’ हे इंग्रजी भाषेचे साप्ताहिक वृत्तपत्र होते. लवकरच दोन्ही वर्तमानपत्रे अत्यंत लोकप्रिय झाली. टिळकांनी त्यांच्या वर्तमानपत्रात भारताची दुर्दशा विशिष्ट प्रकारे प्रदर्शित केली. वर्तमानपत्राद्वारे त्यांनी लोकांच्या समस्या आणि वास्तविक घटनांचे सजीव चित्रण केले.
प्रत्येक भारतीयाने आपल्या अधिकारांसाठी लढा देण्याचे आवाहन त्यांनी केले. १८९० मध्ये बाळ गंगाधर टिळक हे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्येही दाखल झाले. ते म्यूनिसिपल कौंसिल पुणेचे सदस्यही होते. टिळक एक महान समाज सुधारकही होते. त्यांनी बालविवाह रोखण्यासाठी आणि विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी लोकांना प्रेरित केले. त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवादरम्यान लोकांना एकत्र आणून संघटीत करण्याचे कार्य केले.
तुरुंगवास आणि तुरुंगवासातील कार्य:
१८९७ मध्ये टिळकांवर जनतेला ब्रिटिशांविरोधात भडकवत असल्याचा आरोप लावण्यात आला. कोर्टाने त्याला दीड वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. १८९८ मध्ये त्यांची जेलमधून सुटका झाली. सुटकेनंतर टिळकांनी स्वदेशी चळवळ सुरू केली. वर्तमानपत्र आणि भाषणांद्वारे टिळकांनी महाराष्ट्रातील प्रत्येक गावात स्वदेशी चळवळीचा संदेश पोहचवला.
दरम्यान, कॉंग्रेस दोन छावण्यांमध्ये विभागली. हे दोन गट जहाल व मवाळ. मवाळांचे नेतृत्व बाल गंगाधर टिळक आणि जहाल लोकांचे नेतृत्व गोपाळकृष्ण गोखले करीत होते. १९०६ मध्ये टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. टिळकांना सहा वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावून मंडालेच्या कारागृहात नेण्यात आले. टिळकांनी तुरूंगात वाचन आणि लिखाण करण्यात वेळ घालवला. बंदिवासात आयुष्य जगताना त्यांनी ‘गीतारहस्य’ हे पुस्तकही लिहिले.
निधन:
८ जून १९१४ रोजी टिळकांची सुटका झाली. त्यांची सुटका झाल्यानंतर टिळकांनी कॉंग्रेसच्या दोन्ही गटांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या प्रयत्नांना विशेष परिणाम दिसले नाही. लोकांच्या हक्कांसाठी लढत लढत १ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळक यांचे वयाच्या ६४ व्या वर्षी निधन झाले.
About Author:
Nice
ReplyDelete