शहीद क्रांतिकारक राजगुरू | Shaheed Krantikarak Rajguru.
शहीद क्रांतिकारक राजगुरू | Shaheed Krantikarak Rajguru.
arathiinfo04allm |
शहीद राजगुरू यांचा जन्म २४ ऑगस्ट १९०८ साली महाराष्ट्रातील खेड, जिल्हा पुणे येथे झाला. त्यांचे पूर्णनाव शिवराम हरी राजगुरू असे होते. लहानपणापासून क्रांतिकारी विचारांनी प्रभावित असलेले राजगुरू संस्कृत शिकण्यासाठी वाराणसी येथे गेले. येथेच चंद्रशेखर आझाद यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव राजगुरूंवर पडला.
शहीद राजगुरू यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान :
हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी मध्ये सामील झाल्यानंतर त्यांचा संपर्क यतीन्द्रनाथ दास, सुखदेव, भगतसिंग तसेच चंद्रशेखर आझाद यांच्याशी झाला. या संघटनेचा मुख्य हेतू होता देशाला ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त करणे. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली अहिंसेच्या मार्गातून स्वातंत्र्य मिळविण्याचे प्रयत्न सुरु होते. वेगवेगळी आंदोलने, उपोषणे आणि चळवळींचा तो काळ.
अशातच पंजाब येथे एका आंदोलना दरम्यान लाला लजपत राय यांचा ब्रिटीशांच्या लाठी हल्ल्यामध्ये मृत्यु झाला. या प्रसंगामुळे शांततापूर्वक मार्गाने स्वातंत्र्य मिळवणे शक्य नाही असे देशवासीयांना वाटू लागले. यातूनच जन्म घेतला सशस्त्र क्रांतिकारी संघटनेने. या संघटनचे आघाडीचे कार्यकर्ते म्हणून शहीद राजगुरू यांना ओळखले जाते.
लाला लजपत राय यांच्यावर हल्ला करणाऱ्या ब्रिटीश अधिकारी सौन्डर्स ची हत्त्या, करण्याचा कट रचला गेला. या कटात राजगुरुदेखील सहभागी होते. सेन्ट्रल असेम्ब्ली मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला गेला. या घटनेमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता. सामान्य जनतेत क्रांतिकारी विचार जागृत करणे हे या मागचे मुख्य कारण होते. स्वातंत्र्य संग्रामातील देशभक्तांना इंग्रजांनी पकडणे सुरु केले होते. एक एक करून सर्वजण पकडल्या जात होते.
परंतु इंग्रज अधिकाऱ्यांना वारंवार चकमा देत राजगुरू निसटत होते. परंतु दुर्भाग्याने, पुण्यात असताना ते पकडले गेले व लाहोर कटामध्ये सामील असल्याने २३ मार्च १९३१ रोजी त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. राजगुरुंसोबत भगतसिंग आणि सुखदेव या भारतमातेच्या सुपुत्रांनादेखील फासावर लटकविण्यात आले होते.
राजगुरू यांचे स्मारक :
राजगुरू यांचे राष्ट्रीय स्मारक पंजाब मधील फिरोजपुर येथील हुसेनिवाला या ठिकाणी आहे. 23 मार्च या दिवशी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती. त्यामुळे भारतामध्ये हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. राजगुरू यांचा जन्म पुण्यातील खेड ईथला आहे. त्यामुळे त्यांच्या गावाचे नाव खेडे बदलून राजगुरुनगर असे करण्यात आले आहे.
भीमा नदीच्या काठावरील स्थित राजगुरू वाड्यात राजगुरू यांचा जन्म झाला. ही जागा राजगुरू स्मारक म्हणून राखली जाते. हुतात्मा राजगुरू स्मारक समिती एक स्थानिक संस्था आहे जे 2004 या सालापासून प्रजासत्ताक दिनाला ध्वज फडकवते.
शहीद राजगुरू जयंती (२४ ऑगस्ट) :
२४ ऑगस्ट १९०८ रोजी जन्मलेले राजगुरू वयाच्या अवघ्या २२-२३ व्या वर्षी त्यांनी देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावली. अशा या देशभक्ताला नमन करण्याचा दिन म्हणजे २४ ऑगस्ट. या दिवशी आपण शहीद राजगुरू यांना नमन करतो. त्यांच्या जीवनातून देशभक्तीचा मौल्यवान गुण आपण सर्वांनी घेतला पाहिजे.
About Author:
Comments
Post a Comment
These website is not government he is private website.