राजमाता जिजाऊ | Rajmata jijau.

 नमस्कार मित्रांनो, allmarathiinfo04  मध्ये आपले स्वागत आहे. आजच्या लेखामध्ये आपण राजमाता जिजाऊ यांच्या जीवन चरित्राची माहिती बघणार आहोत.असं म्हणतात की जर एखाद्या आईने एखाद्या योद्ध्याला जन्म दिला असेल तर ती आई नक्कीच खास असेल. शिवाजीसारख्या शूर योद्ध्याला जन्म देणारी माता ‘जिजाबाई’ म्हणूनच “राजमाता” ओळखल्या जातात. आज या लेखात आपण महान योद्धा शिवरायांच्या माता ‘जिजाबाई’ यांच्या जीवनाबद्दल माहिती सांगणार आहोत.


allmarathiinfo04

पूर्ण नाव         : जिजाबाई शहाजीराजे   भोसले.

 जन्म             : 12 जानेवारी इ. स. 1598  सिंदखेडराजा,बुलढाणा

मृत्यू              : 17 जुन इ. स.   1674 ( वय  76) पाचाड,रायगडचा पायथा

वडील           : लखुजीराव    जाधव

आई             : माळसाबाई/  गिरिजाबाई

पती              : शहाजीराजे   भोसले  

संतती            :  1) छत्रपती शिवाजी राजे     भोसले

                       2) संभाजी शहाजी भोसले

राजघराणे        : भोसले


राजमाता जिजाऊंचे बालपण -

       राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 ला महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात झाला. राजमाता जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव तर आईचे नाव म्हाळसाबाई असे होते.

         लखुजी जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते व ते सिंदखेडा गावाचे राजा सुद्धा होते. त्या आपल्या आईच्या देखरेखी खाली मोठ्या झाल्या, त्या स्वाभिमानी, अतिशय बुद्धिमान, करारी बाण्याच्या होत्या, त्यांना छळ कपट अजिबात सहन होत नसे, परकीयांचे राज्य त्यांना मान्य नव्हते,पारतंत्र्यात राहणे म्हणजे ती गुलामगिरीच ते कसले जगणे,

थोड्याश्या लोभापायी आपल्याच लोकांनी आपल्याच जिवाभावाच्या माणसांची मुंडकी छाटायची हे त्यांना मान्य नव्हते. रयतेची होणारी होळपट, त्यांनी लहानपणा पासूनच पहिली होती. त्यामुळे त्यांना अश्या गोष्टींचा खूप राग होता त्या रागातूनच त्यांना स्वराज्य स्थापनेची संकल्पना सुचली होती.

चार भावांची ही लाडकी बहीण नक्षत्रासारखी सुंदर, बोलकी,बाणेदार व चुणचुणीत होती. खेळण्या-बागडण्याच्या वयात जिजाऊ तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होत्या.


राजमाता जिजाऊ यांचा विवाह -

    असे म्हणतात की जिजाबाईंच्या लग्नाची जुळवाजुळव त्या 6 वर्षांच्या असतानाच निश्चित झाली होती. त्याच्याशी एक छोटीशी घटनाही जोडलेली आहे. इतिहासात असे लिहिले आहे की तो होळीचा दिवस होता, लखुजी जाधव यांच्या घरी सण साजरा केला जात होता, त्यावेळी मोलाजी त्यांच्या मुलासह जे 7-8 वर्षांचे होते. त्यांच्यासोबत या महोत्सवात सहभागी झाले होते. नृत्य पहात असताना अचानक लखुजी जाधवांना जिजाबाई आणि मालोंजींचा मुलगा शहाजी एकत्र दिसले आणि ‘व्वा काय? जोडी आहे’. हे ऐकून मोलाजी म्हणाले की मग जुळवाजुळव निश्चित करावी.

        त्यावेळी मोलाजी हे सुलतानाचे सेनापती होते आणि लखुजी जाधव हे राजा असतानाही सुलतानाच्या आदेशानुसार त्यांनी आपली मुलगी जिजाऊ म्हणजेच जिजाबाई हिचा विवाह मोलाजींचा मुलगा शहाजी भोसले यांच्याशी केला.


राजमाता जिजाऊ यांचा शहाजीराजांसोबतचा परिचय -

    6 मुली, दोन मुलगे


मुलांची नावे शिवाजी महाराज, संभाजीराजे


जिजाबाई आणि शहाजींच्या लग्नानंतर शहाजीराजे विजापूर दरबारात मुत्सद्दी होते. विजापूरच्या बादशहाने शाहजींच्या मदतीने अनेक युद्धे जिंकली, या आनंदात विजापूरच्या सुलतानाने त्यांना अनेक जहागीरी भेट दिल्या होत्या. जहागीर असलेल्या शिवनेरी किल्ल्याचाही त्या भेटींमध्ये समावेश आहे. जिजाबाई आणि त्यांची मुले इथे राहत असत. जिजाबाईंना 6 मुली आणि दोन मुलगे झाले. त्या पुत्रांपैकी एक शिवाजी महाराज होत.


राजमाता जिजाऊंच्या पोटी जन्मले शिवराय- 

शिवनेरीच्या विजयराज किल्लेदारांच्या जयंतीशी जिजाबाईंच्या मोठ्या मुलाचे संभाजींचे लग्न झाले होते. शहाजीराजे या सोयरिकीमुळे निर्धास्त झाले. त्यांनी जिजाईला संभाजी जयंतीसोबत शिवनेरीवरच ठेवले आणि स्वत: लढाया, चढाया, राजकारण यात गुंतले.


मुसलमानी जुलमी सत्तेकडून होणाऱ्या अन्यायांचा जिजाईंना संताप येई. मुसलमानी सत्तेत सामान्यांचे खडतर जीवन, मुलींना पळवून नेणे, विकणे, भ्रष्ट करणे हे त्यांनी जवळून अनुभवले होते. असुरक्षित जीवनात केव्हा आपण पकडले जाऊ, कैद होऊ ही नित्याचीच भीती होती. दारिद्र्य, दु:ख, कर्जाचे डोंगर यात लोकं भरडली जात होती. धार्मिक, आर्थिक, सामाजिक सर्वच बाबतीत जनतेची होणारी पिछेहाट जिजाईंना बघवत नव्हती. अशा परिस्थितीत गरोदर असलेल्या जिजाबाईंच्या मनात सतत हेच विचार घोळत असे. ही सर्व संकटे दूर व्हावीत, प्रजा सुखी व्हावी, सुरक्षित व्हावी, धर्म-अर्थ-काम-मोक्ष हे तत्त्वज्ञान आनंदाने उपभोगता यावे याकरिता यवनी सत्ता उलथून पडावी असे त्यांना सारखे वाटे. ती सत्ता आपण उलथावी ‘‘पण कशी?’’ या प्रश्नात अडकताच पोटाकडे लक्ष जाई.

        हीच मनोवृत्ती, हेच विचार आणि मनोभावे शिवाईला केलेला नवस, हे गर्भसंस्कार पोटातल्या गर्भावर रुजत होते. गर्भ त्याच विचारांनी वाढत होता, म्हणूनच जिजाईचे डोहाळेही वेगळेच होते. त्यांना स्वार व्हावे, हत्तीवरून मिरवावे, गडांवर फिरावे, नौबतींचे स्वर ऐकावे, हातात तळपती तलवार घेऊन घोड्यावर बसून लढाई करावी, सर्व सत्ता एकछत्राखाली आणून सुवर्णसिंहासनावर विराजमान व्हावे, दासींनी चवऱ्या ढाळाव्या असेच सतत वाटायचे. धर्माचे पुनरुज्जीवन करावे, धर्म वाढवावा, दानधर्म करावा, सर्व गडकिल्ल्यांवर विजयी ध्वज फडकावेत, ही त्यांची स्पंदने ऐकतच पोटातला जीव वाढत होता.


‘‘भवानी माते, माझा हा पोटातला जीव मला पुत्ररूपाने दे, जो कुळाचे नाव काढील. मायभूमीचे पांग फेडेल, धर्म वाढवेल आणि जनतेचा न्यायी राजा होईल. तो यवनांचे वाढते अत्याचार संपवेल.’’ अशी प्रार्थना जिजाबाई रोज भवानीमातेला मनापासून करायच्या. त्यांची प्रार्थना मातेने ऐकली आणि एका तेजस्वी मुलाचा जन्म जिजाईच्या पोटी झाला. हाच ‘शिवाजी.’


मुलाच्या जन्माचा, त्याच्या बाललीलात हरवून जाण्याचा आनंद शहाजीराजांना प्रत्यक्ष अनुभवता आला नाही. ते लढाया, स्वाऱ्या यातच गुंतलेले होते. काही काळाने आदिलशहाने शहाजीराजांच्या पराक्रमाचे चीज म्हणून त्यांना बेंगळुरूचा किल्ला व प्रदेश जहागिरी दिली. तशातच शिवराय दोन वर्षांचे असताना त्यांनी दुसरा विवाह केला. त्यानंतर मात्र शहाजीराजांना स्थैर्य लाभले. ते तेथे व शिवराय आणि जिजाबाई पुण्यास राहू लागले. एका तेजस्वी ताऱ्याला घडवण्याकरिता एक तेजस्वी माता येथेच उदयास आली.


राजमाता जिजाऊ एक आदर्श माता-

      जिजाबाईंची देवावर नितांत श्रद्धा होती. त्या दररोज देवदर्शनास जात तेव्हा त्यांच्यासोबत शिवरायही असे. देवळातल्या भग्न मूर्ती, तोडफोड दाखवून त्या शिवरायांच्या मनात त्यांचे पुनरुत्थान करण्याचे बीज पेरत. त्याच वेळी हा अन्याय, विध्वंस करणाऱ्या यवनांविषयी त्या शिवबांना माहिती सांगायच्या. ते ऐकून शिवबा क्रोधीत व्हायचे. आईने सांगितलेल्या रामायण, महाभारतातल्या कथा ऐकून त्यांच्यातही स्फुरण चढायचे. केव्हा एकदा मीपण पापी, अन्यायी, लोकांना शासन करतो, हाती तलवार घेऊन शत्रूशी लढतो, त्यांचा नि:पात करून प्रजेला संरक्षण देतो अशी त्यांची मन:स्थिती व्हायची.

हे सर्व करण्याकरिता आवश्यक असलेले युद्धकौशल्य तलवार, दांडपट्टा, भाला, धनुष्यबाण, लक्ष्यवेध, कुस्ती याचे शिवबाचे शिक्षण जिजाईने सुरू केले. तसेच शिवबास लिहिणे, वाचणे, अश्वपरीक्षा, रत्नपरीक्षा, गडकिल्ले चढणे इत्यादींतही पारंगत केले. शिवबांसाठी आई हेच परमदैवत हाते. तेच त्याचे विश्व होते. जिजाईही शिवाचे मन सांभाळणे व त्यांना घडवणे हे काळजीपूर्वक करत असत. त्याचवेळी त्याला ‘‘आपल्या आजोबा व वडिलांसारखा तू पराक्रमी हो; पण तो हिंदवी स्वराज्य स्थापण्यासाठी व सुलतानी सत्ता नामशेष करून स्वराज्य व सुराज्य निर्माण करण्यासाठी,’’ असे सांगत असे.


याचा त्या बालमनावर योग्य परिणाम झाला. स्वातंत्र्य, स्वराज्य, देशप्रेम, शत्रूंचा नाश, प्रजाहितदक्ष, स्त्रीदाक्षिण्य हे संस्कार गर्भावस्थेतच रुजले होते. ते आता अतूट, दृढ झाले होते. कर्तृत्व आणि कर्तव्याची जाण शिवबाला आली होती. याच्यामागे जिजाऊ मातामाऊलीचे मनोबल होते.


जिजाबाई सतत आपले मूल गुणवंत, यशवंत, कीर्तिवंत होण्याकरिता जागरूक होत्या. त्याच हेतूने त्यांचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळेच शिवबाला त्या नेहमी ‘तुला न्यायाचं राज्य करायचे आहे. स्वराज्य, सुराज्य आणि धर्मस्थापना करून प्रजेला सुखी करायचे आहे’’ हे सांगायच्या. याच विचारांनी प्रेरित होऊन शिवराय वाढत होते. घडत होते.


पुण्याच्या साऱ्या परिसरात फिरत होते. असाह्य, कंगाल, गरीब जनतेच्या वेदना पाहून दु:खी होत होते. तर भंगलेल्या मूर्ता, पडलेली मंदिरे पाहून व्याकूळ होत होते. ते आपल्या सवंगड्यांना, मित्रांनाही याची जाणीव करून द्यायचे. ते गरीब मावळे होते. त्यांना शिवरायांचे म्हणणे पटायचे. मग लढाईचे बेत ठरायचे.  शिवरायांचे ‘राजा शिवछत्रपती’ होण्याचे बीज त्यांच्या बालपणातच रुजले. आता जिजाईंना वेध लागले ते सूनमुख पाहण्याचे. फलटणच्या मुधोजींची मुलगी सईबाई हिच्याशी 1640 साली शिवबांचे लग्न झाले. हा विवाह पुण्यात संपन्न झाला. तेव्हा शिवराय दहा वर्षांचे होते. या विवाहाला शहाजीराजे नव्हते. तेव्हा त्यांनीच शिवरायांसह जिजाबाईंना एकदा बेंगळुरूला येण्याविषयी सुचवले.


जिजाबाईंनाही पतिदर्शनाची आस लागली होती. शिवबाही वडिलांना भेटण्यास आतुर होते. ते उभयता बेंगळुरूला गेले. शहाजी-शिवाजी एकमेकांना कडकडून भेटले. बापलेकांच्या या हृद्यभेटीने व पतिदर्शनाने जिजाबाईंचे नेत्र सुखावले. सर्वांना आनंद झाला; पण शिवरायांच्या लग्नाला आपण नव्हतो ही खंत शहाजीराजांना होती. शिवरायांच्या नावे पुण्यासुप्याची जहागिरी करून दिली. आता पुण्यासुप्यासह सई-सोयराबाईंची जबाबदारीही शिवबांवर होती. आणि या सर्वांची काळजी घेत स्वराज्य व धर्मसंस्थापनाला चालना द्यायचे काम जिजाबाईंना करायचे होते. म्हणूनच शिवरायांना कुशल संघटनकौशल्य, राजनीती, राजकारण समजेपर्यंत दादोजी कोंडदेव हे जहागिरीची व्यवस्था पाहणार होते.


जिजाबाईंच्या देखरेखीखाली दादोजी कोंडदेवांच्या छायेत शिवरायांचे सर्वसमावेशक शिक्षण सुरू होते. नीळकंठ- पेशवा, बाळकृष्ण हणमंते- ‘मुजूमदार’, सोनो विश्वनाथ- डबीर, रघुवीर बल्लाळ- सबनीस म्हणून कारभार पाहत होते.


मुलांचे संगोपन व राज कारभार-

        शिवाजी महाराज १४ वर्षांचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकाऱ्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी जिजाऊ यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजीच्या राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी शिवरायांना पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या रामायण, महाभारतातील गोष्टी सांगितल्या. सीतेचे हरण करणाऱ्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता, वगैरे. जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच शिवाजीराजे घडले. जिजाबाईंनी नुसत्या गोष्टीच सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.

          शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफजलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वतः तंटे सोडवत.


भोसले व जाधवांचे वैर -

      लखुजीराव जाधव हे निजामशाही दरबारातील बलाढ्य, मातब्बर मंडळी पैकी एक होते. एक दिवशी सर्व सरदार, जहागिरदार, मनसबदार आणि वतनदार शाही कदम पोशी करून आपापल्या घरी जावयास निघाले असता. महाद्वार सामोरी भयंकर गर्दी झाली. या गर्दीत खंडागळ नावाच्या सरदाराचा हत्ती अनियंत्रित झाला. आणि लोकांना पायाखाली तुडवू लागला.


अशावेळी लखुजीराव जाधव यांचा मुलगा दत्ताजीने आपल्या सैन्यासह हत्तीला रोखण्यासाठी त्यावर बाणांचा,भाल्यांचा आणि तलवारीचा वार करू लागले. हा सर्व प्रकरण रोखण्यासाठी विठोजी राजे भोसले यांचे दोन्ही मुले संभाजी आणि खेलोजी ( शहाजीराजे यांचे चुलतभाऊ ) दत्ताजी वर तुटून पडले. आणि भोसले - जाधव यांच्यात युद्ध पेटले. आणि संभाजी ने दत्ताजीला ठार केले. ही बातमी पुढे पोहचलेल्या लखुजीराव जाधव यांना कळताच ते सूड घेण्यासाठी भोसल्यांवर चालून आले.


आणि संभाजी वर प्रहार केला. आपल्या चुलतभावावर वार केला म्हणून शहाजीराजे भोसले देखील या लढाईत उतरले परंतु लखुजीराव जाधवांचा आक्रोश सामोरी त्यांचा टिकाव लागला नाही. लखुजीराव यांच्या तलवारीच्या प्रहाराने शहाजी महाराज गंभीर जखमी झाले. आणि त्यांनी अखेरीस संभाजीला ठार केला.

या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले.[९] नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपूर उतरला होता.

  

जीवन व कार्य- 

      जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. हे सर्व गुण त्यांनी त्यांचा शिवरायांना दिले. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या.

        त्यांचा मोठा मुलगा संभाजीचा मृत्यू अफझलखानाने केला होता. त्याचा सूड घेण्यासाठी त्यांनी शिवरायांना प्रोत्साहन दिले, जे त्यांनी पूर्ण केले.

      पुणे येथील आपल्या पतीची जहागीर त्यांनी समर्थपणे चालवून त्याचा विकास केला. त्यांनी कसबापेठ गणपती मंदिराची स्थापना केली. तसेच केवरेश्वर मंदिर आणि तांबडी जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार केला.

       शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पार पाडली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.

      शिवरायांच्या पहिल्या पत्‍नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांचे जुलमाने धर्मपरिवर्तन झाले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.

      राजांच्या सर्व स्वाऱ्यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना स्वराज्याच्या सीमा वाढवत रांगणा किल्ला जिंकून घेतला. जिजाबाईंनी पूर्णतः जबाबदारी उतारवयातही कौशल्याने निभावून नेली.


राजमाता जिजाऊ यांचे निधन-

        जिजामाता यांच्यासाठी स्वराज्य हे फारच महत्वाचे होते. त्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना तयार केले. त्यांच्या करारी स्वभावाबद्दल आपण सगळेच जाणतो. ऐतिहासिक दाखल्यानुसार ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. तो दिमाखदार सोहळा आपल्या डोळ्यांनी जिजामाता यांनी पाहिला. त्यानंतर अगदी 12 दिवसात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  16 जून 1674 रोजी त्यांचे निधन झाले.  रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचड या गावी  राजमाता जिजाबाई यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने सगळीकडे शांतता पसरली. पण त्यांच्या संस्कारांचा वसा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे नेला आणि महाराष्ट्राला जगाच्या नकाशात एक वेगळीच ओळख मिळवून दिली. अशी ही धन्य माता जिजाऊ यांची आठवण होणार नाही असे मुळीच होणार नाही. 


       जिजामाता या एक प्रभावी व वचनबद्ध महिलेच्या रूपात ओळखल्या जातात. त्यांच्यासाठी आत्मसन्मान आणि त्यांची मूल्ये स्वतः व कुटुंबांच्या वर होत्या. त्यांचे विचार दूरदर्शी होते. त्या एक प्रभावी योद्धा देखील होत्या. त्यांच्या या गुणांच्या संचार शिवाजी महाराजांन मध्ये देखील झाला होता. अशा या महान मातेस सादर प्रणाम.


About Author:

allmarathiinfo04 या ब्लॉगवर तुम्हाला निबंध, भाषण, अनमोल विचार, आणि वाचण्यासाठी कथा मिळेल. तुम्हाला काही माहिती लिहायचं असेल तर तुम्ही आमच्या ब्लॉगवर लिहू शकता.





Comments

Popular posts from this blog

मुरुड जंजिरा | Murud Janjira.

सिंधुदुर्ग | Sindhudurg Fort.

Independence day | भारतीय स्वातंत्र्य दिन