शेतकरी जगाचा पोशिंदा | Shetkari jagacha poshindha.
नमस्कार मित्रांनो, allmarathiinfo04 मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण शेतकरी जगाचा पोशिंदा या विषयावर निबंध बघणार आहोत.
allmarathiinfo04 |
भारतीय शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे.
आपल्या देशामध्ये ७०% लोक हे शेतीवर अवलंबून आहेत व शेती हेच त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहत व त्याचा शेत हाच व्यवसाय होय, भारतीय शेतकरी दसरा व्यवसाय करू शकत नाहीत, त्यामुळे ते शेतीकडे आपले उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पाहतात.
आपल्या भारतामध्ये शेतकऱ्यांचे सर्वसाधारण दोन गट पडलेले आहेत. एक म्हणजे बडे शेतकरी जे सधन आहेत. ज्यांचा शेती हा मुख्य व्यवसाय व अन्य दुय्यम व्यवसाय आहेत. या लोकांच्या हातामध्ये बराच पैसा व सत्ता एकवटलेली आहे आणि दुसरा म्हणजे गरीब शेतकरी ज्याकडे दुसऱ्या दिवशी भाकरीची तजवीज कशी करावी असा प्रश्न असतो. या शेतकऱ्यांकडे पैसा अगदी अल्प प्रमाणात असतात व यामध्ये बहुसंख्य शेतकरी वर्गाचा समावेश होतो. असा हा बहुसंख्य गरीब शेतकरी वर्ग याकडे पैसे अगदी अल्प प्रमाणात असतात.
शेतकऱ्यांकडे शेती हेच उदरनिर्वाहाचे साधन असते व दुसरे उदरनिर्वाहाचे साधन नसल्यामुळे जेव्हा पूर येतो व जेव्हा दुष्काळ पडतो अशा काळात शेतात असलेले सर्व पीक वाया जाते किंवा जळून जाते, शेतकऱ्यांचे साधे भांडवलही भागत नाही. भारतीय शेती ही अनिश्चित स्वरूपाची आहे व ती सर्वस्वी पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी हा सर्वस्वी पावसाच्या पडण्यावर व न पडण्यावर त्याचे भवितव्य अवलंबू असते, जेव्हा जास्त पाऊस पडतो तेव्हा शेतातील सर्व पिकांची नासधूस होऊन जाते व शेतकऱ्याला खायलाही काही शिल्लक राहत नाही, अशावेळी त्याच्यासमोर प्रश्न असतो काय खायचे ? व पुढच्या वेळेस पीक लावण्यासाठी भांडवल कोठून उभारावयाचे.
कित्येकदा असे होते की शेतकऱ्यांना शेतामध्ये दोन दोनदा पेरणी करावी लागते. अशावेळेस शेतकरी असा विचार करतो की आपण यावेळेस सावकाराकडून पैसे घेऊ व पुढच्या वर्षी पीक आल्यावर त्याला परत करू, पण दुर्दैवाने असे होतेच असे नाही.
अशा वेळी गरीब शेतकरी सावकाराकडून कर्ज म्हणून पैसे घेतो. दागिने असेल तर ते गहाण ठेवतो व पैसा उभा करतो. पण सावकाराकडून घेतलेले कर्ज त्याला फिटता फिटत नाही. त्या पैशावरचे व्याज फेडण्यातच शेतकऱ्याचे आयुष्य जाते व मुद्दल फेडणे हे तर दूरच. अशा वेळी शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न उभे राहतात. त्यांना आपल्याजवळ असेल नसेल तेवढी पुंजी सावकाराला द्यावी लागते.
अशा प्रकारे शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकतात. कर्जाने बेजार झालेले शेतकरी शेवटचा सुटकेचा उपाय म्हणून 'आत्महत्येकडे' पाहू लागतात. मग ते औषध पिऊन, फाशी घेऊन आपली सुटका करवून घेतात. कारण त्यांच्यापुढे कोणताच पर्याय उपलब्ध नसतो. आणि आता आपला जगून काही उपयोग नाही कारण त्याच्यामागे सावकार नावाचे भूत लागलेले असते. त्यामुळे बहुतांश कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात.
त्यात शासनाने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून १ लाख रुपये दिले जात आहेत. त्यामुळे कर्जबाजारी सामान्य शेतकरी असा विचार करतो की आपण जगून तर काही कमावू शकत नाही निदान मेल्यावर तरी आपल्या कुटुंबियांना सुख देऊ. त्यामुळे बरेचसे ज्येष्ठ नागरिक आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात व आपल्या कुटुंबियांना १ लाख रु. मिळवून देतात. पण शेतकरी हा आपल्या देशातील राजा आहे. त्यानेच अशी आत्महत्या करण्यास सुरुवात केली तर आपली पूर्ण अर्थव्यवस्था डळमळेल.
भारताच्या उत्तरेकडील भाग हा सधन आहे. जसजसे दक्षिणेकडे यावे तशी शेतकऱ्यांची परिस्थिती खालावत जाताना दिसते. भारतात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक या राज्यात प्रामुख्याने गरीब शेतकरी आढळतात. शेतकऱ्यांची आत्महत्या कशी रोखायची ? हा मोठा प्रश्न आज शासनासमोर आ वासून उभा आहे.
शासनाने आपल्या परीने उपाय करण्याचा प्रयत्न केला पण तो शेतकऱ्यांकडे पोहोचतोच असे नाही. ज्यांची पिके दुष्काळात गेली त्यासाठी सरकारने भरपाई दिली पण ज्याचे नुकसान झाले आहे त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही. शासनाने शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारावी यासाठी सबसिडी द्वारे त्यांना सवलती उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या फायद्याच्या विविध योजना आखल्या. पिकांवरील घेतलेल्या कर्जाचे व्याज माफ केले.
शेतकऱ्यांना कमी दराने कर्ज उपलब्ध होईल असे उपाय केले. पण हे सर्व कागदोपत्रीच राहिले ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले असे नाही. व आताच शासनाने नागपूर पॅकेज जाहीर केले आहे. पण शेतकऱ्यांसाठी पुरवण्यात आलेला पैसा शेतकऱ्यांपर्यंत येईपर्यंत अनेकांच्या खिशात जातो.
शेतकऱ्यांना फायदा व्हावा व त्याची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी शासनाने उपाय करावयास हवेत. शासनाने आपला कारभार अधिक पारदर्शी करावा. आपल्या येथे असणाऱ्या भ्रष्टाचारी लोकांना काढून टाकावे व शेतकऱ्यांपर्यंत योजना जातील अशी तजवीज करावी. शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे हंगाम सुरू होण्यापूर्वी उपलब्ध करून द्यावे. शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून द्यावे. शेतकऱ्यांना सोईचे होईल अशा ठिकाणी बँकांच्या शाखा काढाव्यात व सावकाराच्या तावडीत सापडलेल्या शेतकऱ्यांची मुक्तता करावी.
शेतीवर पूर्णत: शेतकरी अवलंबून असतो.
त्यांना जोडव्यवसाय करण्यास प्रोत्साहन द्यावे व जोडव्यवसायाचे प्रशिक्षण द्यावे व कसे चांगल्या प्रकारे आपला माल विकावा, साठवून ठेवावा याचे प्रशिक्षण द्यावे. जोपर्यंत शेतकरी स्वावलंबी होत नाहीत तोपर्यंत त्यांच्या मानेवर आत्महत्येची टांगती तलवार आहे.
यासाठी शेतकऱ्याने ही आपल्या हिताचा जोडधंदा स्वीकारावा व स्वावलंबी बनावे. मुख्य म्हणजे शासनाने शेतकऱ्यांना शेतीचे नवे तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे जेणेकरून शेतकरी आपले उत्पन्न वाढवू शकतील व पुन्हा एकदा आपला शेतकरी आनंदी होईल व म्हणेल -
मेरी देश की धरती सोना उगल उगले हिरे मोती .
About Author:
Nice blog👌
ReplyDeleteFarmer is a real hero✌
ReplyDelete