गुरु पौर्णिमा | Guru Poornima.

 गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर  मी माझ्या सर्व गुरूंना नमन करतो

 नमस्कार मित्रांनो, allmarathiinfo04  मध्ये आपले स्वागत आहे. आजच्या लेखामध्ये आपण  गुरुपौर्णिमेचे महत्व याच्यावर माहिती बघणार आहोत. आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असे म्हटले जाते. चांगले संस्कार लावण्यासाठी आपल्याला गुरूंच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते. गुरु आणि शिष्य या दोघांसाठी गुरुपौर्णिमा हा खूप महत्वाचा दिवस असतो. आपल्या देशात सर्वे सण मोठ्या आनंदात आणि उत्साहाने साजरे केले जातात. गुरुपौर्णिमा संपूर्ण देशात खूप भव्यतेने साजरी केली   जाते. 

allmarathinfo04

*गुरुपौर्णिमेचे महत्व _*

        आपल्या जीवनात गुरूला खूप महत्त्व आहे. “गुरु” हा शब्द गु आणि रु या शब्दांपासून बनला आहे. गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे संहारक. अशा प्रकारे गुरूला अंधार दूर करणारा किंवा अंधारातून प्रकाशाकडे नेणारा असे म्हटले जाते.

     म्हणजेच ज्याप्रमाणे देवतांची पूजा केली जाते, त्याचप्रमाणे गुरूंचीही पूजा केली पाहिजे कारण त्यांनीच देवाची ओळख करून दिली आहे. योग्य गुरूशिवाय माणूस जीवनात भरकटतो.

          गुरूपौर्णिमेला व्यासपुजा करण्याची पध्दत आहे. महर्षी व्यासांनी महाभारतासारखा अलौकिक आणि सर्वात श्रेष्ठ असा ग्रंथ लिहीला. महाभारत सामान्य माणसाला धर्मशास्त्र, नितीशास्त्र, व्यवहारशास्त्र, आणि मानसशास्त्राची देखील ओळख करून देतो. अश्या महान आणि श्रेष्ठ ग्रंथाची निर्मीती करणारे महर्षी व्यास. त्यांच्या ऐवढा महान गुरू अद्याप झाला नाही, त्यांच्या श्रेष्ठत्वाची पुजा करण्याचा हा गुरूपौर्णिमेचा दिवस व्यासपौर्णिमा म्हणुन देखील ओळखला जातो.

    भारतीय संस्कृतीचे मुलाधार आणि शिल्पकार महर्षी व्यासांना समजले जाते. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील ज्यावेळी ’ज्ञानेश्वरी ’ लिहीण्यास सुरूवात केली त्यावेळी सुरूवातीलाच ’व्यासांचा मागोवा घेतु’ असा उल्लेख करून व्यासांच्या श्रेष्ठत्वाप्रती कृतज्ञता व्यक्त केलेली आपल्याला पहायला मिळते.

        कृष्ण सुदामा यांना सांदिपनी ऋषींनी घडवले, त्याचप्रमाणे इतर प्रसिध्द गुरू शिष्य जोडयांमधे राम लक्ष्मण – विश्वामित्र, परशुराम – कर्ण, अर्जुन – द्रोणाचार्य, जनक – याज्ञवल्क्य, शुक्राचार्य – जनक, अश्या गुरूशिष्य जोडया आपल्याला पहायला मिळतात.

   भगवंत श्रीकृष्णांनी सांदिपनी ऋषींच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी आपले थोरले बंधु निवृत्तीनाथांनाच गुरू मानले, तर संत नामदेवांचे गुरू होते विसोबा खेचर… या गुरूपरंपेला पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की भारतीय परंपरेने गुरूला कायमच पुजनीय मानले आहे.

    अश्या या गुरूप्रती कृतज्ञता      व्यक्त करण्याकरता आपण गुरूपौर्णिमेला गुरूचरणी नतमस्तक होत आदर व्यक्त करतो. पौर्णिमा म्हणजे प्रकाश ! गुरू नित्य शिष्याला ज्ञानाचे ज्ञानामृत पाजुन घडवत असतात अश्या गुरूची प्रार्थना करण्याचा हा दिवस….

       आपली सर्वात पहिली गुरू म्हणजे आपली आई ! चांगले काय? वाईट काय याची जाणीव ती सर्वप्रथम आपल्याला करून देते आणि म्हणुन ती आपली गुरू ठरते. पुढे अध्ययनाच्या रूपाने नव्या गुरूशी आपला परिचय होतो आणि आपण घडत जातो. ही गुरू शिष्य परंपरा आपल्याला भारता व्यतिरीक्त इतर कुठेही पहायला मिळत नाही. या गोष्टीवरून आपल्या लक्षात येतं की आपण किती महान देशात जन्म घेतला आहे.


गुरुपौर्णिमा माहिती_

      गुरू हा ज्ञानाचा सागर आहे. शिष्याने विनम्र भाव अंगी बाणवल्याशिवाय या गुरूरूपी सागरातील जल त्याला प्राप्त करता येणार नाही त्यामुळे शिष्याने नेहमी विनम्र असावे. जीवन जगत असतांना प्रत्येक वळणावर आपल्याला नवनवीन माणसे भेटतात. त्यांच्याकडुन आपल्याला नविन काहीतरी शिकायला मिळतं. ज्यांच्याकडुन चांगले काहीतरी आपल्याला शिकायला मिळाले ते आपले गुरूच!


गुरूब्रम्हा गुरूर्विष्णुः           गुरूर्देवो महेश्वरः।

गुरूसाक्षात् परंब्रम्ह तस्मै श्रीगुरूवे नमः।।


   आयुष्य जगत असतांना आपल्याला गुरूने शिकवीलेले सदाचरण कायम आपण लक्षात ठेवावयास हवे आणि पुढच्या पिढीकडे संस्कारातुन हस्तांतरीत करायला हवे. हीच आपल्या गुरूचरणी आपली खरी गुरूदक्षिणा ठरेल!

तर आपल्याला चांगले वाईट शिकवणाऱ्या माता-पित्यास, गुरुजन वर्गाला या लेखाला गुरुदक्षिणा म्हणून समर्पित करतो आणि या लेखाची सांगता करतो, आज आपण जे काही आहोत ते त्यांच्या मुळेच म्हणून त्या सर्व जीवन जगायला शिकवणाऱ्या शिक्षकांना विनम्र अभिवादन.


गुरुपौर्णिमेनिमित्त एक सुंदर कविता_

        

     //जीवनाचा शिल्पकार//

कुंभार घडवितो ते मातीचे घडे

देऊनी त्यास विशिष्ट आकार, 

आपल्या आयुष्यातील स्वप्न,  करतो गुरू साकार...... 


चढावी कशी वाट काटेरी,

गाठावी कशी आयुष्याची दोरी , 

मदतीस असतो गुरु,

सोपतो आपल्या हाती ज्ञानाची शिदोरी ..... 


गुरु हा मार्ग दाता खरा,

ज्ञान भंडाराचा , 

झळझळ वाहणारा झरा .... 


ज्यांच्या पाठी असतो गुरु अवतार,

त्यास नको अजून कुठला आधार , 

देतो हा मातीच्या गोळ्यासही आकार,

गुरु हाच खरा जीवनाचा शिल्पकार .... 


गुरुपौर्णिमेनिमित्त मराठी सुविचार-

१) गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम                 आणि अखंड वाहणारा झरा.


२) जेव्हा सगळे रस्ते बंद पडतात, तेव्हा नवा रस्ता दाखवतो गुरु,  पुस्तकांमधील ज्ञान नाही तर  आयुष्याचा पाठ पडतात गुरु.


३) गुरु आहे सावली, गुरु आहे आधार

गुरु आहे निसर्गात नसे त्याला आकार,

गुरु आहे अंबरात, गुरु आहे सागरात,

शिकावे ध्यान लावुनी, गुरु आहे चराचरात.


४) तोच गुरु श्रेष्ठ ज्याच्या प्रेरणेने,

एखाद्याचे चरित्र बदलते,

मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या संगतीत

रंगत बदलते.


५) शिक्षण हा कलेचा सर्वात मोठा प्रकार असू शकतो कारण मानवी मन आणि आत्मा हे माध्यम आहे.”


६) गुरु सर्वात महान असतो, गुरु सर्वाना ज्ञान देतो.


७) शिक्षक असे असतात जे ज्ञान देतात आणि एका उद्देशाने आपल्याला चांगले मानव बनवतात.


८)  गुरू विना ज्ञान नाही आणि ज्ञानाविना आत्मा नाही. 


९) गुरुशिवाय ज्ञान नाही

ज्ञानाशिवाय आत्मा नाही

ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म

सर्वकाही गुरूंचीच देन आहे


१०) प्रथमसी आई वडील माझे गुरू त्यानंतरच माझे आयुष्य सुरू

देहाची या तिजोरी नको त्यात पापाचा ठेवा

मला ज्यांनी जन्म दिला त्यांना सुखी ठेव देवा….



About Author:

allmarathiinfo04 या ब्लॉगवर तुम्हाला निबंध, भाषण, अनमोल विचार, आणि वाचण्यासाठी कथा मिळेल. तुम्हाला काही माहिती लिहायचं असेल तर तुम्ही आमच्या ब्लॉगवर लिहू शकता.

Comments

Popular posts from this blog

मुरुड जंजिरा | Murud Janjira.

सिंधुदुर्ग | Sindhudurg Fort.

Independence day | भारतीय स्वातंत्र्य दिन