महेंद्रसिंग धोनी | Mahindra Singh dhoni.
नमस्कार मित्रांनो, allmarathiinfo04 made आपले स्वागत आहे. महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय माजी क्रिकेटपटू आहेत.त्यांना माही किंवा एम एस धोनी या नावाने ओळखले जाते. चला पाहूयात त्यांच्या विषयी माहिती.
allmarathiinfo04 |
धोनीचा जन्म 7 जुलै 1981 ला बिहार मधील रांची (आता झारखंड मध्ये समाविष्ट झाले आहे) येथे झाला. मुळात हा राजपुत परिवार उत्तराखंड मधील होता. त्यांचे वडिल पान सिंह मेकाॅन (स्टील मंत्रालया अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम) सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांनी कनिष्ठ व्यवस्थापन पदांवरही काम केले आहे.
आई देवकी देवी या गृहीणी आहेत. माही ला एक मोठा भाऊ (नरेंद्र सिंह धोनी) आणि एक मोठी बहिण (जयंती गुप्ता) आहे. भाऊ राजकारणात सक्रिय असुन बहिण इंग्रजी विषयाची शिक्षीका आहे.
झारखंड च्या रांची मध्ये श्यामाली इथं डीएव्ही जवाहर विद्या मंदिर मधुन धोनी ने आपले शालेय शिक्षण पुर्ण केले.तो एक अॅथलेटिक विद्यार्थी होता, सुरूवातीच्या काळात क्रिकेट पेक्षा बॅडमिंटन आणि फुटबाॅल या खेळांमधे त्यांला अधिक रूची होती. आपल्या शाळेतील फुटबाॅल टिमचा तो चांगला गोलकिपर म्हणुन ओळखला जायचा.
या दरम्यान धोनी च्या फुटबाॅल कोच ने त्याला स्थानीक क्लब च्या क्रिकेट टीम चा विकेटकिपर म्हणुन पाठविले. त्यावेळी धोनी ने आपल्या चांगल्या प्रदर्शनाने सगळयांनाच आकर्षीत केले आणि 1995 ते 1998 दरम्यान कमांडो क्रिकेट क्लब टीम मधे नियमित विकेटकिपर म्हणुन स्थान मिळविले.
माही ने सुरूवातीपासुन चांगले प्रदर्शन केले आहे.1997.98 दरम्यान माही ला विनु मंकड ट्राॅफी करीता अंडर.16 चॅम्पियनशिप करीता निवडले. 10 वी नंतर माही ने क्रिकेटला गांभीर्याने घेण्यास सुरूवाती केली होती. क्रिकेट करता या दिग्गज खेळाडुला आपल्या शिक्षणासोबत मात्र तडजोड करावी लागली.माही ने 12 वी नंतर शिक्षण सोडले.
महेंद्रसिंग धोनी यांची एक दिवसीय सामन्यातील कारकीर्द-
सतत आपल्या चांगल्या प्रदर्शनामुळे 2004.2005 साली महेंद्र सिंग धोनीची निवड राष्ट्रीय एकदिवसीय सामन्याकरीता झाली. आपला पहिला एकदिवसीय सामना त्याने बांग्लादेश संघा विरूध्द खेळला होता. आपल्या पहिल्या सामन्यात धोनी चांगले प्रदर्शन करू शकला नाही आणि केवळ शुन्यावर बाद झाला.
खराब प्रदर्शना नंतर देखील धोनीच्या नशीबाने त्याला साथ दिली आणि म्हणुनच पाकिस्तान विरूध्द खेळल्या जाणा.या एकदिवसीय सामन्यासाठी निवडसमीतीने त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला. या वेळी मात्र धोनीने निवडकत्र्यांना आणि क्रिकेट रसिकांना निराश केले नाही आणि या सामन्यात जिद्दीने आणि जोमाने पाकिस्तान विरूध्द उत्तम प्रदर्शन केले.
या सामन्यात धोनीने 148 धावा काढुन पहिला भारतीय यष्टीरक्षक फलंदाज होण्याचा बहुमान मिळवीला. महेंद्र सिंग धोनीला भारत – श्रीलंका व्दिपक्षीय साखळी सामन्यांमधे पहिल्या दोन सामन्यांमधे फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही तरी देखील या मालिकेत तिस.या सामन्यात त्याला फलंदाजी करण्याकरीता पुढे करण्यात आले.
माहीने या संधीचे अक्षरशः सोने केले आणि उत्कृष्ट प्रदर्शन केले.या सामन्यात त्याने 299 धावांच्या लक्ष्याला पहाता 145 चेंडुत नाबाद 183 धावा बनविल्या. धोनीने या मालिकेचे सर्व विक्रम मोडीत काढले आणि जोरदार प्रदर्शन केल्याने त्याला मालिकावीर घोषीत करण्यात आले 2005-2006 मधे भारत – पाकिस्तान एक दिवसीय मालिकेत धोनी ने मालीकेत 4-5 सामन्यांमधे 68 धावा, नाबाद 72 धावा, नाबाद 2 धावा, नाबाद 77 धावा, बनविल्या आणि आपल्या संघाला 4-1 ने मालिका जिंकण्यास मदत केली.
आपल्या चांगल्या प्रदर्शनाने धोनी 20 एप्रील 2006 ला रिकी पाॅंटिंग ला मागे टाकत आयसीसी एक दिवसीय रॅंकिंग मधे पहिल्या क्रमांकावर पोहोचला. 2007 क्रिकेट विश्वकप स्पर्धेच्या आधी वेस्टइंडीज आणि श्रीलंके विरूध्द दोन मालिकांमधे धोनीने उत्कृष्ट प्रदर्शन केले परंतु धोनी विश्व कप स्पर्धेत प्रदर्शन करण्यात अपयशी राहिला आणि भारतिय संघ या स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही.
2007 साली दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड विरूध्द दोन मालिकांसाठी एक दिवसीय सामन्यांकरीता महेंद्र सिंग धोनी ला व्हाॅईस कॅप्टन अर्थात उपाध्यक्ष बनविण्यात आले.धोनीने दक्षिण अफ्रिकेत भारतिय संघाचे आयसीसी विश्व कप-20 ट्राॅफी करीता नेर्तृत्व केले आणि पाकिस्तान संघाला हरवुन ट्राॅफी जिंकली. 20-20 त आपल्या यशस्वी कर्णधारपदा नंतर महेंद्र सिंग धोनी ला सप्टेंबर 2007 मधे ऑस्ट्रेलिया विरूध्द एक दिवसीय मालीकेकरीता भारतिय संघाच्या नेर्तृत्वाची जवाबदारी सोपविण्यात आली.
पुढे महेंद्र सिंग धोनी ने 2011 मध्ये विश्वकप जिंकण्याकरीता भारतिय संघाचे नेर्तृत्व केले, याकरीता क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांसमवेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ने देखील त्याचे कौतुक केले. 2009 साली सामन्यांदरम्यान धोनी ने 24 डावांमधे 1198 आणि 30 डावांमधे रिकी पाॅंटींग च्या धावांइतक्या धावा काढल्या.
यामुळे माही 2009 मधे अनेक महिन्यांकरीता आयसीसी एक दिवसीय फलंदाजांमध्ये क्रमांक एक वर राहीला. महेंद्र सिंह धोनी ने 2011 साली विश्व कप स्पर्धेत भारताचे नेर्तृत्व केले.श्रीलंके विरूध्द अखेरच्या सामन्यात त्यांनी फलंदाजी क्रमवारीत स्वतःला अग्रक्रमावर ठेवत नाबाद 91 धावा काढल्या 2013 मध्ये धोनी ने आयसीसी चॅंपीयंन्स ट्राॅफी मध्ये भारताचे नेर्तृत्व केले आणि टेस्ट मॅच, एकदिवसीय विश्वकप व चॅंपीयंस ट्राॅफी जिंकणारा एकमात्र कर्णधार बनला.
२००७ आयसीसी विश्वचषक ट्वेंटी -२० -
धोनीला २००७ मध्ये पहिल्यांदा टी -२० विश्वकरंडक जिंकण्यासाठी निवडले होते. त्याने स्कॉटलंडविरुद्ध कप्तान पदावर पदार्पण केले परंतु सामना संपला होता. त्यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेतील आयसीसी विश्वचषक ट्वेंटी -२० स्पर्धेत भारताला २४ सप्टेंबर २००७ रोजी तीव्र लढतीत पाकिस्तानवर विजय मिळवून दिला आणि दुसऱ्या कोणत्याही प्रकारात विश्वचषक जिंकणारा कपिल देव नंतर दुसरा भारतीय कर्णधार बनला.
महेंद्रसिंग धोनी कसोटी सामन्यातील कार कीर्ती -
2005 साली श्रीलंके विरूध्द खेळल्या गेलेल्या मालिके दरम्यान एम एस धोनी ला भारतीय कसौटी संघात यष्टीरक्षक म्हणुन निवडण्यात आले होते. त्याने आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात 30 धावा काढल्या, पाऊसामुळे हा सामना मधातच बंद करण्यात आला होता. 2006 च्या सुरूवातीला पाकिस्तान विरूध्द खेळतांना माहीने कसोटी सामन्यातील पहिले शतक आक्रमक पध्दतीने झळकविले त्यामुळे भारताला फाॅलो.
आॅन पासुन वाचण्यात मदत झाली. धोनीने पुढच्या तीन सामन्यांमधे शानदार प्रदर्शन केले.यातील एक सामना पाकिस्तान विरोधात आणि दोन सामने इंग्लंड विरोधात खेळले. 2008 साली धोनी ने आॅस्ट्रेलिया विरूध्द खेळल्या गेलेल्या मालिके दरम्यान उपकर्णधार म्हणुन संघाचे नेर्तृत्व केले. या सोबतच या मालिकेच्या चैथ्या सामन्या दरम्यान कर्णधार पदावर महेंद्र सिंह धोनीची नियुक्ती करण्यात आली.
त्यापुर्वीच्या सामन्यात कर्णधार अनिल कुंबळे जखमी झाले होते आणि त्यांनी त्यांच्या निवृत्तीची घोषणा केली होती. महेंद्र सिंह धोनी ने 2009 साली श्रीलंके विरूध्द खेळल्या गेलेल्या मालिकेत शानदार प्रदर्शन करीत दोन शतकं झळकवले होते आणि भारतिय संघाला विजय मिळवुन दिला कर्णधार म्हणुन त्याच्या उत्तम कामगिरीमुळे 2009 साली भारतिय संघ आयसीसी कसोटी क्रमवारीत क्रमांक 1 चा संघ बनला 2014 मधे धोनीने आपल्या यशस्वी कारकीर्दीतील शेवटचा कसोटी सामना ऑस्ट्रेलिया विरूध्द खेळला होता.
या सामन्यात त्याने 35 धावा काढल्या. हा सामना संपल्यानंतर महेंद्र सिंह धोनीने कसोटी सामन्यातुन निवृत्ती जाहिर केली तरी देखील पुढे एक दिवसीय कसोटी सामने खेळणे त्याने सुरू ठेवले परंतु 2017 साली जानेवारीत एकदिवसीय सामन्यांच्या कर्णधार पदातुन देखील तो निवृत्त झाला. धोनी आज देखील मर्यादीत षटकांचा सामना खेळु शकतो.
रजनी ट्रॉफी ची सुरुवात -
1999.2000 मध्ये धोनी ला रणजी ट्राॅफी खेळण्याची संधी मिळाली.बिहार विरूध्द आसाम असा हा सामना खेळला गेला.या सामन्यात महेंद्र सिंग धोनी ने नाबाद 68 धावा केल्या. पुढच्या सत्रामधे धोनी ने बंगाल विरूध्द सामना खेळला यात त्याने शतक मारले तरी देखील संघ हा सामना हरला.
या ट्राॅफी च्या सत्रात माही ने एकुण 5 सामन्यांमधे 283 धावा काढल्या.या ट्राॅफी नंतर धोनी ने स्थानिक स्तरावर अनेक सामने खेळले. धोनीच्या चांगल्या प्रदर्शनानंतर देखील ईस्ट जाॅन सिलेक्टर तर्फे त्यांची निवड करण्यात आली नाही, यामुळे धोनी खेळापासुन दुरावला आणि त्याने नौकरी करण्याचा निर्णय घेतला.
वयाच्या 20 व्या वर्षी माही ला खेळ कोटयातुन खडगपुर रेल्वे स्थानकावर ट्रॅव्हलिंग टिकीट परीक्षक (टीटीई) पदावर नौकरी मिळाली आणि तो पश्चिम बंगाल मधल्या मिदनापुर ला निघुन गेला.
2001 ते 2003 पर्यंत धोनीने रेल्वे कर्मचारी म्हणुन काम केलं.धोनी ला लहानपणापासुन खेळाची आवड असल्याने नौकरीत त्याचे मन जास्त काळ रमले नाही. दुलीप ट्राॅफीत निवड झाल्यावर देखील सामना खेळु शकला नाही. 2001 साली महेंद्र सिंग धोनी ची पुर्व क्षेत्रात दुलीप ट्राॅफी खेळण्याकरीता निवड झाली.
परंतु बिहार क्रिकेट असोसिएशन ही माहिती माहीला वेळेवर देऊ शकले नाही कारण माही त्यावेळी पश्चिम बंगाल मधील मिदनापुर येथे होता. धोनी ला ही माहिती त्यावेळी मिळाली जेव्हां त्यांची पुर्ण टिम अगरतला या ठिकाणी आधीच पोहोचली होती.या ठिकाणीच हा सामना खेळला जाणार होता.
माहीच्या मित्राने कोलकत्ता विमानतळावरून फ्लाईट पकडण्याकरता एका कारची सोय केली परंतु ती कार मध्येच खराब झाली आणि माही विमानतळावर वेळेवर पोहोचु शकला नाही. या सामन्यात दिपदास गुप्ता ने यष्टीरक्षक बनुन हा सामना खेळला.
महेंद्रसिंग धोनीची पर्सनल लाईफ-
धोनीच्या वैयक्तिक आयुष्यात असे बरेच लोक आहेत जे त्याचे बालपण मित्र आहेत. त्याच्या फक्त एका मित्राने त्याला हेलिकॉप्टर शॉट खेळायला शिकवले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणानंतर धोनीला प्रियांका नावाच्या मुलीच्या प्रेमात पडले होते. नंतर प्रियांकाचा एका कार अपघातात मृत्यू झाला.
धोनी आणि साक्षी एका हॉटेलमध्ये भेटले असल्याचे एमएस धोनी या चित्रपटात सांगण्यात आले आहे. वास्तविक ते खरे नाही. सत्य हे आहे की धोनीचे वडील आणि साक्षीचे वडील दोघेही एकाच कंपनीत काम करायचे. आश्चर्य म्हणजे साक्षी आणि धोनी देखील एकाच शाळेत शिकत आहेत, परंतु ज्या वेळी धोनीने शाळेत जाणे थांबवले, त्याच वेळी साक्षीने शाळेत प्रवेश घेतला होता. ज्यामुळे धोनी शाळेत साक्षीला भेटू शकला नाही. काही काळानंतर साक्षीचे कुटुंब रांची सोडून देहरादूनला गेले. साक्षीचे आजोबा आधीपासूनच देहरादूनमध्ये राहत होते.
नोव्हेंबर-डिसेंबर 2007 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत धोनीची टीम इंडियामध्ये निवड झाली होती, तेव्हा टीम कोलकातामध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना खेळत होती. कोलकात्यातच धोनीने साक्षीला भेटले. त्यावेळी भारतीय संघ हॉटेलमध्ये थांबला होता तेथे साक्षीने धोनीची भेट घेतली.
साक्षीला धोनीची ओळख करून देणारी युद्ध जीत दत्ता ची हॉटेल मॅनेजर होता. ज्या दिवशी धोनी आणि साक्षीची भेट झाली त्या दिवशी साक्षीच्या हॉटेल इंटर्नशिपचा शेवटचा दिवस होता, म्हणून साक्षीने हॉटेल सोडले होते. त्यानंतर धोनीने मॅनेजरकडून तिचा नंबर घेऊन साक्षीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
जेव्हा धोनीने तिला पहिल्यांदा मेसेज केला तेव्हा साक्षीला असे वाटले की कोणीतरी तिच्याबरोबर विनोद करीत आहे. नंतर जेव्हा तिला समजले की तो खरोखर धोनी आहे आणि तो भारतीय संघाचा कर्णधार झाला आहे, तेव्हा तिला भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने संदेश दिला आहे यावर तिला विश्वासच बसला नाही.
साक्षीला २ महिने मनापासून पटवून दिल्यानंतर धोनी आणि साक्षी दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली आणि त्यानंतर दोघांनी २०१० साली लग्न केले. धोनीला एक मुलगी झिवा असून ती अवघ्या 5 वर्षाची आहे.
भारताचा कर्णधार-
धोनीने भारताचे नेतृत्व करत असताना डिसेंबर २००९मध्ये आयसीसी कसोटी क्रमवारीत भारत १ क्रमांकावर पोहचले होते. २ एप्रिल २०११ रोजी श्रीलंकेविरुद्ध २०११ च्या आयसीसी क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत विजयी झाल्यानंतर, तेंडुलकरने सांगितले की धोनीचा शांत स्वभाव हा त्याच्या सर्व सहकाऱ्यांवर थांबला होता आणि त्याने धोनीची दबाव हाताळण्याची क्षमता अविश्वसनीय असल्याचे सांगितले. मार्च २०१३ मध्ये धोनीने ४९ कसोटी सामन्यात सौरव गांगुलीच्या २१विजय मिळवल्याचा विक्रम मोडला तेव्हा तो सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार बनला. जून २०१३ मध्ये, भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि धोनीच्या कप्तानपदाच्या आधारे इंग्लंडला फाइनलमध्ये पाच धावांनी पराभूत केले. श्रीलंकेविरुद्धच्या उपांत्य फेरीनंतर आणि दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान यांना गट पातळीत पराभूत केले, महेंद्र सिंग धोनीला सर्वोत्तम कर्णधार मानले जाते.
इंडियन प्रीमियर लींक-
धोनीने चेन्नई सुपरकिंग्जसोबत १५ लक्ष डॉलर्सचा करार केला होता. यामुळे प्रथम हंगामाच्या लिलावासाठी आयपीएलमध्ये तो सर्वात महागडा खेळाडू बनला. त्याच्या कर्णधारपदाखाली, चेन्नई सुपर किंग्जने २०१० आणि २०११ आणि २०१८ आणि २०२१ इंडियन प्रीमियर लीगचे खिताब आणि २०१० आणि २०१४ चे चॅम्पियन्स लीग टी -२० खिताब जिंकले. दोन वर्षांसाठी सीएसके स्थगित झाल्यानंतर, २०१६ मध्ये रुईसिंग पुणे सुपरर्जेंटने १९ लक्ष अमेरिकी डॉलर्सची खरेदी केली होती आणि त्याला कर्णधार म्हणून नामांकन देण्यात आले होते. तथापि, त्याची टीम ७ व्या स्थानावर राहिली. २०१७ मध्ये, त्यांची टीम फाइनलमध्ये पोहोचली, जिथे ते मुंबई इंडियन्सकडून हारले. २०१८ च्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपरकिंग्ज आयपीएलमध्ये परतला आणि फ्रॅंचाइजीचे नेतृत्व करण्यासाठी धोनीला पुन्हा निवडण्यात आले. धोनीने टूर्नामेंटमध्ये ४५५ धावा केल्या आणि आपल्या टीमला आयपीएलचे तिसरे विजेतेपद जिंकून दिले.धोनीने 2019च्या आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंगजला आठव्यांदा फायनलमध्ये प्रवेश करून दिला. विरोधक मुंबई इंडियन्स होते.त्यांनी टॉस जिंकून बॅटिंग घेतली व 149 धावा काढल्या. पण चेन्नईला 149 धावा निघाल्या नाहीत. शेवटच्या चेंडूवर 2 धावा पाहिजे असतात चेन्नई पराभूत झाली आणि उपविजेतेपद त्यांना स्वीकारावे लागले.2020च्या आयपीएल मध्ये चेन्नई शेवटच्या स्थानावर होती , दरवर्षी टॉप 4 मधली टीम शेवट होती,शेवट मॅच झाल्यावर धोनीला विचारले गेले ,' तू 2021 ची आयपीएल खेळशील का ? ' तेव्हा धोनी म्हणाला ' उफकोर्सली नॉट ' पण धोनीने 2021 ची आयपीएल खेळली . धोनीने CSK ला फायनल पर्यंत पोहचवले . फायनल KKR विरुद्ध होती CSK ने पहिल्यांदा बॅटिंग करत 192 धावा केल्या . CSK ने धोनीच्या नेतृतवाखाली 165 धावांवर रोखले व माहिने CSK ला इंडियन प्रीमियर लीगचे चौथे विजेतेपद जिंकून दिले.
About Author:
Comments
Post a Comment
These website is not government he is private website.