पावसाळा मराठी निबंध | Rainy Season Marathi eassy.
नमस्कार मित्रांनो , allmarathiinfo04 मध्ये आपले स्वागत आहे आज.
आपण माझा आवडता ऋतू या विषयावर माहिती बघणार आहोत.
उन्हाळा, हिवाळा ,पावसाळा असे तीन ऋतू आहेत .पावसाळा हा एक असा ऋतू आहे जो सर्वांनाच आवडतो, पावसा मुळे निसर्गात खुपसारे बदल होतात तसेच आम्ही ह्या पावसात खूप मज्या करतो. तर मित्रांनो आज आम्ही पावसाळा ह्या वर आपल्या साठी पावसाळा हा मराठी निबंध लिहिला आहे, तो आपल्यांना नक्की आवडेल. तर चला निबंधाला सुरवात करू या.
| allmarathiinfo04 |
200,300 व 500 शब्दांत निबंध जाणून घेणार आहोत.
1) 200 शब्दात निबंध
येरे येरे पावसा.. तुला देतो पैसा..
कधी जून महिना सुरू होतोय याचीच वाट पाहत असतो आपण कारण उन्हाळा ऋतुत होर पोळून निघाल्यावर सगळ्यांना पावसाची आस लागली असते . आपल्या देश मौसमी हवामानाचा प्रदेश असल्याने देशात जून ते सप्टेंबर या कालावधीत च पावसाळा सुरू होतो. जून महिन्यात वातावरणात आश्चर्य जनक बदल होतात. आभाळ ढगांनी दाटून जात , वेगाने वारे वाहतात आणि विजेच्या कडकटासह रिमझिम पावसाळा सुरू होतो. आणि पुढे तीन,चार महिने पडत राहतो.वातावरण प्रसन्न आणि शीतल होते.
आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. म्हणून पावसाची एक प्रमुख भूमिका आहे. पाऊस पडताच शेतीला सुरुवात होते.अनेक शेतकरी चर खोदून ठेवून त्यात पावसाचे पाणी जमा करतात. तसेच देशात पिण्याचे पाणी सुध्दा पावसा वरच निर्भर असते. पाऊस झाला की नदी,नाले, धरणे वाहून निघतात.कमी पाऊस पडला की पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण होतो.
पावसाळा सुरू झाल्यावर पर्यावरणाचे रुप पालटून जाते. धरती माता जणू हिरवी शालु नेसली आहे असा आभास होतो. पावसाळा सुरू झाला की अनेक परिवार पर्यटनाला , पावसाची मज्जा घ्यायला सुरुवात होते. पावसाळा उत्साहाचा प्रतीक आहे म्हणून पावसाळयात देशात अनेक सण साजरे होतात. श्रावण महिना, गणपती उत्सव, दहीहंडी , रमझान, नवरात्र खूप धूम धाम मधे साजरा केले जाते.
एकी कडे पाऊस जीवाला निसर्गाने दिलेला आशीर्वाद आहे तर कधी हाच पाऊस एका कोपा सारखं सुद्धा रुप धारण करतो. पावसाळ्यात अनेक रोग पसरतात त्यामुळे अनेक जीव त्रस्त होतात. अतिवृषटीमुळे शेतीची तसेच जीव हानी होते. कमी पाऊस पडला की शेती मरून जाते आणि पिण्याचा पाण्याचा तुटवडा निर्माण होतो. पावसाचे अनेक फायदे आहेत तसेच खूप नुकसान सुद्धा आहेत.
तरीही पावसाळा ऋतु सर्व जीव सृष्टीचा सर्वात प्रिय ऋतु आहे हे नक्की.
2) 300 शब्दात निबंध
भारत देशात पावसाळा हा ऋतू जून महिन्यात चालू होतो आणि तो सप्टेंबर महिन्याच्या शेवटी संपतो. हा ऋतू उन्हाळा ऋतूच्या नंतर येणारा ऋतू आहे. उन्हाळा ऋतूमध्ये उन आणि गरमी यामुळे लोकांची खूप तगमग होते. त्यामुळे प्रत्येक जण या गरमी पासून सुटका करण्यासाठी पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो.
पावसाळा ऋतू सुरू होण्याच्या आधी पासूनच लोकांची पावसाळा ऋतुसाठी तयारी सुरू होते. बाजारात रंगीबेरंगी छत्र्या, रेनकोट विकत घेण्यासाठी लोकांची तोबा गर्दी होते. रंगीबेरंगी छत्र्यांचे, रेनकोट चे बाजारात मोठेमोठे स्टॉल लागतात.
मी देखील माझ्या बाबसोबत बाजारात छत्री आणि रेनकोट घेण्यासाठी जातो. आम्ही घरातील सर्व सदस्यासाठी रंगीबेरंगी छत्र्या आणि रेनकोट विकत घेतो. मला पिवळा रंग खूप आवडतो त्यामुळे मी नेहमी पिवळ्या रंगाची छत्री माझ्यासाठी विकत घेतो.
मिर्गाचा पहिला पाऊस पडला की सर्वांचीच तहान भागते, सर्वांच्याच पाण्याचा प्रश्न मिटतो. संपूर्ण धरणी पहिल्या पावसात भिजून निघते. असे म्हणतात की चातक हा पक्षी केवळ पावसाचेच पाणी पिवून जगतो. त्यामुळे चातकाची तहान भागते. रानावनात मोर नाचताना दिसून येतात.
पावसाळा ऋतूमध्ये पहिला पाऊस पडला की सर्वांनाच खूप आनंद होतो. प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने आनंद व्यक्त करू लागतात. लहान मुले पावसाच्या पहिल्या सरी बरसत असताना पाण्यात उड्या मारतात, नाचतात. आई वडील ओरडले तरी ते ऐकत नाहीत. ते आपल्याच धुंदीत असतात.
पहिल्या पावसाचा आनंद केवळ लहान मुलेच घेत नाहीत तर यात प्रौढ व्यक्तींचा देखील समावेश असतात. पशु पक्षी, झाडे देखील आपापल्या परीने आनंद व्यक्त करतात.
भारतातील अनेक राज्यांमध्ये पहिल्या पावसाच्या स्वागतासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, सण उत्सव पार पाडतात. लोक या सणातून मेघराजाची पूजा करतात, त्याला खूप खूप धन्यवाद देतात आणि संपूर्ण पावसाळा असाच बरसत राहा अशी त्याला विनंती देखील करतात.
पावसाळा ऋतुमधिल वातावरण खूपच प्रसन्न असते शिवाय अनेक लोकांना पावसात भिजायला आवडते. त्यामुळे खूप लोकांना पावसाळा ऋतू आवडतो. मी देखील पहिल्या पावसाची अगदी चातकासारखी वाट पाहत असतो.
पावसाळा ऋतू जेवढा आनंद घेऊन येतो तेवढाच तो कधी दुःख देखील आणतो. या ऋतूमध्ये कधी पाऊस इतका जास्त पडतो की अगदी नद्यांना पुर येतो, पाणी गाव शहरात शिरते, शेतातील पिके वाव्हून जातात, घरे बुडतात, रस्ते बंद पडतात, वाहतूक ठप्प पडते, यात अनेक माणसे, पशू पक्षी आपला जीव देखील गमावतात.
हे पावसाचे रुद्र रूप खूपच भयानक असते. अशा वेळेस खूप मोठ्या प्रमाणत वित्त हनी तर होतेच शिवाय काही प्रमाणात जीवित हनी देखील होते. याच कारणामुळे कित्येक लोकांना हा ऋतू नावडता देखील आहे.
पण निसर्ग नेहमीच असे रुद्र रूप धारण करत नाही. निसर्ग जेंव्हा कोप करतो तेंव्हा त्याचे असे रुद्र रूप पाहायला मिळते. मला मात्र लहानणापासूनच हा ऋतू खूप आवडतो, या ऋतूमध्ये बरसणाऱ्या पहिल्या पावसाच्या सरित आपला आनंद व्यक्त करावासा वाटतो. त्यामुळे मी दरवर्षी पहिल्या पावसात मनसोक्त भिजतो.
3) 500 शब्दात निबंध
पाऊसाचे कितीही सुंदर वर्णन केले तरी अपुरेच पडेल. निसर्ग आपल्या पूर्ण सौंदर्यात फक्त पाऊसातच असेल असे कधी कधी वाटते. कवीकल्पना तर अनेक प्रकारे पाऊसाला स्वतःमध्ये साठवत असते. पाऊसाचे पाणी, त्याचा रिमझिम आवाज, मातीचा दरवळत राहणारा सुगंध, संपूर्ण वनराई आणि शेती हिरवाईने सुशोभित होत असते.
पाऊस सुरू होण्याअगोदर अती रहस्यमय अशी चाहूल सुरू होते. पक्षी, प्राणी, झाडे सर्वजण सजग होतात. मेघांची गर्जना ही जणू शंखनाद असतो. मग हळूहळू पाऊसाचे थेंब जमिनीवर वर्षाव करीत स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतात.
पावसाळा हा ऋतू जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत असतो. शाळा सुरू होणे आणि पाऊसाचे आगमन हे एका वेळीच होते. शाळेचा नवीन वर्ग आणि पाऊसाची रिमझिम एका वेळीच चालू असते. त्यामुळे पावसाचा संबंध हा माझ्यासाठी सृजनात्मक असाच आहे.
आत्ता २१व्या शतकात अनेक बदल पहावयास मिळत आहेत. त्यामध्ये मुख्यतः राहणीमानात होत चाललेला बदल आहे. त्यामुळे भारत हा शेतीप्रधान देश असून देखील पावसाची तेवढी उत्सुकता आत्ता पहावयास मिळत नाही. ग्रामीण आणि निमशहरी भागात मात्र आजही पावसाळा सुरू होताच एका नवीन जीवनाची सुरुवात झाल्याप्रमाणे वाटत राहते.
निसर्गचक्र एका विशिष्ट पद्धतीत चालू असते. हिवाळा आणि उन्हाळा हे ऋतू सर्व स्थिती सांभाळून असतात तर पावसाळा ऋतू पृथ्वीला पाण्याचे दान देऊन जात असतो. पाण्याचे उन्हाळ्यात होणारे बाष्पीभवन हवामानाच्या बदलामुळे ढग निर्माण करतात आणि चार महिन्यांच्या कालावधीत पाणी स्वरूपात पुन्हा एकदा जमिनीवर येतात. हे सर्व एका चक्राकार गतीने चालले असल्याने त्यास जलचक्र असेही संबोधतात.
थंड शीतलता आणि आल्हाददायक निसर्ग देखावा यामुळे मला पावसाळा खूप आवडतो. प्रत्येक वर्षी पहिल्या पाऊसात भिजणे हे तर माझे कर्तव्यच बनून गेले आहे. पाऊस हा ऋतू मुख्यतः आवडण्याचे कारण म्हणजे सृष्टीत सर्व काही सृजन स्वरूपात कार्यरत असते. हवा, पाणी, आणि झाडे हे तर आपले जीवन पुन्हा एकदा सुरू करत असतात. स्वतःमध्ये नवीन ऊर्जा भरत असतात.
शेतकरी खायला लागणारे अन्नधान्य या पावसाळा ऋतुत उत्पादित करत असतो. त्यामुळे वर्षभर पाळीव जनावरे आणि मनुष्य यांच्या खाण्यापिण्याची सोय पावसाळ्यात पूर्ण होत असते. कोकिळा, पोपट, आणि मोर हे पक्षी तर पावसाळ्यात कलकल माजवतात. मोराचे पावसाळ्यात नाचणे हे तर आकर्षक सौंदर्याचा एक नमुना असतो. शेतीची सर्व कामे पावसाळ्यात होत असतात.
आज पाऊस अनियमित होऊ लागला आहे. प्रदूषण, वाढती लोकसंख्या, नैसर्गिक संसाधनांचा वारेमाप वापर हा निसर्गावर अवकृपा करत चालला आहे. वृक्षतोडसुद्धा त्यासाठी कारणीभूत आहे. झाडे आणि जंगले कमी झाल्याने अवकाळी आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. त्यातच पावसाळा हा शहरात फक्त पाणी साचवून ठेवतो त्यामुळे शहरी लोक फक्त पावसाचा तिटकारा करतात.
आपण आपल्या जाणिवा आणि निसर्गाप्रती संवेदना वाढवल्या पाहिजेत. पाऊस आपल्याला जीवनदायी आहे. खाणे आणि पिणे या प्राथमिक गरजा काहीही न मागता निसर्ग स्वतःहून पूर्ण करीत असतो. त्यामुळे पाऊसाचे खूप उपकार मानवावर आहेत असे म्हणता येईल. अशा प्रकारे पावसाळा हा नवीन आल्हाददायक उर्जाशक्तीचा ऋतू माझा आवडता ऋतू आहे.
पावसावर एक छान कविता-
केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर ।।
गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर ।।
पापणीत साचले, अंतरात रंगले ।
प्रेमगीत माझिया मनामनात धुंदले ।
ओठांवरी भिजला ग आसावला सूर ।।
भावफूल रात्रिच्या अंतरंगि डोलले ।
धुक्यातुनी कुणी आज भावगीत बोलले ।
डोळियांत पाहिले, कौमुदीत नाचले ।
स्वप्नरंग स्वप्नीच्या सुरासुरांत थांबले ।
झाडावरी दिसला ग भारला चकोर ।।
About Author:
Nice
ReplyDelete