सिंधुदुर्ग | Sindhudurg Fort.

नमस्कार मित्रांनो , allmarathiinfo04  आपले स्वागत आहे. आजच्या लेखामध्ये आपण सिंधुदुर्ग किल्ल्याची संपूर्ण माहिती मराठीत बघणार आहोत.

allmarathiinfo04

नाव           -सिंधुदुर्ग

उंची           - 200 फुट

प्रकार          - जलदुर्ग

चढाईची श्रेणी  - सोपी

ठिकाण           -सिंधुदुर्ग, 

                      महाराष्ट्र

जवळचे गाव     - सिंधुदुर्ग, 

                       मालवण

डोंगररांग           - सिंधुदुर्ग

सध्याची अवस्था    -व्यवस्थित

स्थापना               - नोव्हेंबर  

                          २५ , इ.  

                           स. 

                           १६६४


भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून, इ.स. २०१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.


सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास -

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे हा सिंधुदुर्ग किल्ला होय. महाराजांकडे ३६२ किल्ले होते. या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश-वऱ्हाड या देशापर्यंतचा विस्तार होता. भुईकोट आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रूंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे, हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. चांगल्या, भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्रकिनाऱ्याची पाहणी झाली. इ.स. १६६४ साली मालवण जवळील कुरटे नावाचे काळा कभिन्न खडक असलेले बेट किल्ल्यासाठी निवडले. महाराजांच्या हस्ते किल्ल्यांच्या तटांची पायाभरणी झाली. आज मोरयाचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. एका खडकावर गणेशमूर्ती, एकीकडे सूर्याकृती आणि दुसरीकडे चंद्राकृती कोरून त्या जागी महाराजांनी पूजा केली.

असे म्हणतात की, किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होन खर्ची पडले. उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. ज्या चार कोळी लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले, त्यांना गावे इनामे देण्यात आली. ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुरटे खडकावर तीन शतके उभा आहे, तो शुद्ध काळाकभिन्न खडक मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. या खडकावर समुद्र मार्गानी व्यापलेले क्षेत्र सुमारे ४८ एकर आहे. त्यांचा तट २ मैल इतका आहे. तटाची उंची ३० फूट असून रूंदी १२ फूट आहे. तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर २२ बुरुज आहेत. बुरुजाभोवती धारदार खडक आहे. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरला आहे. पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात ५०० खंडी शिसे घातले असून या तटाच्या बांधणीस ८० हजार होन खर्ची पडले. सिंधुदुर्ग या किल्ल्यावर शिवरायांच्या उजव्या हाताचे व डाव्या पायाचे ठसे उमटलेले आहेत.

शिवकालीन चित्रगुप्त याने लिहिलेल्या बखरीत याबाबत पुढील मजकूर नमूद केला आहे :


'चौऱ्याऐंशी बंदरात हा जंजिरा अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका, अजिंक्य जागा निर्माण केला ।

सिंधुदुर्ग जंजिरा, जगी अस्मान तारा ।

जैसे मंदिराचे मंडन,श्रीतुलसी वृंदावन, राज्याचा भूषण अलंकार ।

चतुर्दश महारत्नापैकीच पंधरावे रत्न, महाराजांस प्राप्त जाहले ।"


सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे -


१) प्रवेश द्वार :

सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रवेशद्वार हे पूर्वेच्या दिशेने आहे.किल्ल्याचे प्रवेशद्वाराचे अशी रचना केली आहे की दुरूनच वाटते की किल्ल्याचे भिंत असल्यासारखे पण किल्ल्याच्या त्याजवळ उतरल्यावर एक खिंड लागते मग सिंधुदुर्ग किल्ल्याचा प्रवेशद्वार लागतो. किल्ल्याच्या दरवाजा साठी उंबराच्या लाकूड आणि सागवान लाकडाची जोड करून बनवलेला आहे. उंबराचे लाकूड हा दीर्घकाळ टिकतो म्हणून याचा उपयोग केला आहे.


 २) गोड्या पाण्याची विहीर-

सिंधुदुर्ग किल्ल्यावर तीन गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. त्यांची नावे दूध विहीर, साखर विहीर व दही विहीर अशी आहेत.


३) शिवराजेश्वरांचे मंदिर:

छत्रपती शिवाजी महाराजांची बसलेली मूर्ती या मंदिरात आहे.


४) शिव मंदिर :

या मंदिरामध्ये शिवलिंगा सोबतच एक भुयार आहे जी तीन किलोमीटर खोल आणि 12 किलोमीटर लांबीचे आहे जी गावात निघते.छत्रपती शिवाजी महाराजांची अशी कल्पना होती की जर सिंधुदुर्ग किल्ला शत्रूच्या ताब्यात गेला तर गडावरील स्त्रियांना सुखरूप गावात पोहोचल्या जाईन आशी या गुप्त मार्गाची व्यवस्था होती.


सिंधुदुर्ग किल्ल्याशेजारील इतर पाहण्यासारखी ठिकाणे – 

 १) टरकली समुद्रकिनारा

 २)कोळंब समुद्रकिनारा

 ३)रामेश्वर मंदिर

 4)रॉक गार्डन

 ५)मालवण सागरी अभयारण्य

 6)त्सुनामी बेट

 7)रघुनाथ मार्केट इ.


सिंधुदुर्ग किल्ल्याचे महत्व -

शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या ५२ असून ४५ दगडी जिने आहेत. ह्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत. त्यांची नावे दूध विहीर, साखर विहीर व दही विहीर अशी आहेत. या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी तीस ते चाळीस शौचालयाची निर्मिती केली आहे. या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे. हे मंदिर इ.स. १६९५मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले.

सिंधुदुर्ग महोत्सव- 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान म्हणून ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामास यावर्षी साडेतीनशे वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून महारा़्ष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दि. २२ एप्रिल ते २४ एप्रिल २०१६ या काळात सिंधुदुर्ग महोत्सवाचे आयोजन केले आहे.महाराष्ट्रा सरकार व मालवण येथील किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग किल्ला आणि मालवण येथील बोर्डिंग ग्राऊंडवर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दि. २२ एप्रिल रोजी महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे.सिंधुदुर्ग महोत्सवाच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. २१ एप्रिल रोजी सायं.४ वा मालवण बाजारपेठेतून भव्य शिवप्रेरणायात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. या यात्रेदरम्यान सिंधुदुर्गाला लाभलेल्या ३५० वर्षाच्या ऐतिहासिक परंपरेचा पट उलगडून दाखवला जाणार आहे. दि.२२ एप्रिल ते २४ एप्रिल या तीन दिवसांमध्ये शिवाजी महाराजांच्या आरमारी कौशल्याची महती सांगणाऱ्या कार्यक्रमांचा खजिना इतिहास प्रेमींसह युवा पिढीलाही अनुभवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा लाभलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर सुमारे अडीचशे कलावंतांचा शिवकालीन युद्धकलांचा थरार "शिव शौर्योत्सव" या कार्यक्रमात दररोज स. ९ ते सं. ५ या वेळेत पाहता येणार आहे. दि. २२ एप्रिल रोजी सायं ६.३० वा महोत्सवाच्या औपचारिक उद्‌घाटन सोहळयानंतर केरळ, मणिपूर, प.बंगाल, झारखंड, आसाम, उ.प्रदेश आणि ओडीसा या राज्यातील जवळपास १०० कलावंत भारतातील युद्धकलांचे सादरीकरण करणार आहे. राष्ट्रीय पातळीवरील या दुर्मिळ कलांचे दर्शनही उपस्थितांसाठी पर्वणीच ठरणार आहे. यानंतर नाट्यदिग्दर्शक मिलिंद पेडणेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला 'कोकण रजनी' हा कार्यक्रम मुंबईतील व्यावसायिक कलाकार सादर करतील. दि. २३ एप्रिल रोजी संध्याकाळी नंदेश उमप हे त्यांच्या साथीदारांसह सादर करीत असलेला "शिवसोहळा" ही ऐतिहासिक सांस्कृतिक मेजवानी हे रसिकांसाठी खास आकर्षण असेल.या महोत्सवासाठी खास पर्यटकांकरिता सोय म्हणून किल्ल्यावर जाण्याकरिता प्रवासी बोट सेवेच्या दरात ५० टक्के सवलतीच्या दर आकारण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर रोज पाच हजार पर्यटकांना रु. ५७ ऐवजी रु.२९ एवढाच आकार बोटीने प्रवास करण्यासाठी द्यावा लागेल.


महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी दि. २४ एप्रिल रोजी शिवकालीन स्फूर्तिगीतांच्या संगीतमय मैफिलीचा आस्वाद घेता येणार आहे. यात प्रसिद्ध कलाकार स्वरदा गोखले, प्रसेनजित गोखले, सुवर्णा माटेगांवकर, पराग माटेगांवकर, संदीप उबाळे हे शिवस्तुतिपर लोकप्रिय गीते सादर करणार आहेत.


तीन दिवसाच्या महोत्सवाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथे सकाळी ९ ते रात्री ८ वाजता रांगोळी, शिवकालीन नाणी, किल्ले छायाचित्र, ऐतिहासिक संदर्भग्रंथ, पुस्तके यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. चिवला बीच या ठिकाणी वाळूशिल्प प्रदर्शन भरविण्यात येणार आहेत. या ठिकाणी शिवाजी महाराजांचे नावाड्याच्या वेशातील वाळूशिल्प साकारण्यात येणार आहे.



सिंधुदुर्ग किल्ला का प्रसिद्ध आहे? 

सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्र, भारतातील सिंधुदुर्ग या किनारपट्टी जिल्ह्यात स्थित एक प्रसिद्ध ऐतिहासिक खूण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत बांधलेल्या या किल्ल्याला ऐतिहासिक आणि स्थापत्यशास्त्राचे महत्त्व आहे. मोक्याचे स्थान, प्रभावी रचना आणि समृद्ध वारसा यामुळे सिंधुदुर्ग किल्ला एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनला आहे. येथे किल्ल्याचा इतिहास, स्थापत्य, महत्त्व आणि इतर समर्पक माहितीचे तपशीलवार वर्णन आहे.



ऐतिहासिक पार्श्वभूमी:

सिंधुदुर्ग किल्ला 17 व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज, थोर मराठा योद्धा राजा यांनी बांधला होता. हा किल्ला परदेशी नौदल शक्तींच्या वाढत्या वर्चस्वाला रोखण्यासाठी बांधण्यात आला होता, विशेषत: ब्रिटिश, डच आणि पोर्तुगीज, ज्यांनी कोकण किनारपट्टीवरील सागरी व्यापार मार्गांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मालवणच्या किनाऱ्याजवळ असलेल्या कुर्ते बेट या खडकाळ बेटावर ते सामरिकदृष्ट्या स्थित होते.


बांधकाम आणि वास्तुकला:

सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम 1664 मध्ये सुरू झाले आणि 1667 मध्ये शिवाजी महाराजांचे शिल्पकार आणि शिष्य हिरोजी इंदुलकर यांच्या देखरेखीखाली पूर्ण झाले. हा किल्ला स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या लाल लॅटराइट दगडाचा वापर करून बांधण्यात आला होता, ज्यामुळे त्याला त्याचे वेगळे स्वरूप प्राप्त होते.सिंधुदुर्ग किल्ला सुमारे ४८ एकर क्षेत्रफळात पसरलेला असून चारही बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेला आहे. यात भव्य भिंती, बुरुज, टेहळणी बुरूज आणि मध्यवर्ती किल्ला यांद्वारे वैशिष्ट्यीकृत एक अद्वितीय आणि मजबूत रचना आहे. किल्ल्याच्या भिंती सुमारे 4 मीटर उंच आणि 2 मीटर  जाड आहेत ज्यामुळे शत्रूच्या हल्ल्यांपासून मजबूत संरक्षण मिळते.

सिंधुदुर्ग किल्ल्यातील सर्वात उल्लेखनीय पैलूंपैकी एक म्हणजे भूमिगत बोगद्यांचे गुंतागुंतीचे जाळे. हे बोगदे गोड्या पाण्याच्या स्त्रोतांपर्यंत सुरक्षित प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी आणि आणीबाणीच्या काळात सुटकेचा मार्ग म्हणून काम करण्यासाठी बांधले गेले होते. किल्ल्यामध्ये मंदिरे, निवासी क्वार्टर, धान्य कोठार आणि साठवण क्षेत्रे यांसारख्या विविध संरचना देखील आहेत.


महत्त्व आणि सांस्कृतिक वारसा:

सिंधुदुर्ग किल्ल्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. परकीय आक्रमणांपासून मराठा साम्राज्याचे रक्षण करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. हा किल्ला नौदलाच्या ऑपरेशनसाठी तळ म्हणून काम करत होता आणि शत्रू सैन्यापासून किनारी प्रदेशांचे रक्षण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होता.सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवराजेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाणारे शिवाजी महाराजांचे पवित्र मंदिर असल्यामुळे त्याला धार्मिक महत्त्व आहे. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे आणि महान मराठा राजाला श्रद्धांजली वाहणारे भक्त भेट देतात.हा किल्ला मराठ्यांच्या स्थापत्यकौशल्याची साक्ष देतो. त्याचे बांधकाम त्या काळातील प्रगत लष्करी अभियांत्रिकी तंत्रांचे प्रदर्शन करते. स्थानिक पातळीवर उपलब्ध साहित्याचा वापर आणि किल्ल्याच्या रचनेत नैसर्गिक वैशिष्ट्यांचे एकत्रीकरण त्या काळातील वास्तुविशारद आणि कारागीर यांच्या कल्पकतेवर प्रकाश टाकते.


पर्यटन आणि अभ्यागत अनुभव:

सिंधुदुर्ग किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व, विलोभनीय स्थान आणि स्थापत्य वैभवामुळे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धी मिळाली आहे. पर्यटक मालवण येथून बोटीने किंवा कमी भरतीच्या वेळी उथळ खडकाळ पॅचमधून चालत किल्ल्यावर प्रवेश करू शकतात.

किल्ल्यात प्रवेश केल्यावर, वास्तूची भव्यता आणि अरबी समुद्राचे विहंगम दृश्य पाहून पर्यटक मंत्रमुग्ध होतात. किल्ल्याचे अन्वेषण केल्याने अभ्यागतांना त्याच्या विविध वैशिष्ट्यांचे कौतुक करता येते, ज्यात कलालबांगडी, फतेहगंज आणि चिवला यांसारख्या बुरुजांचा समावेश आहे, जे समुद्रकिनार्यावर चित्तथरारक दृश्ये देतात.शिवराजेश्वर मंदिर हे किल्ले संकुलातील प्रमुख आकर्षण आहे. हे शिल्पे आणि कोरीव कामांनी सुंदरपणे सुशोभित केलेले आहे आणि भक्त साइटचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व पाहून आशीर्वाद घेऊ शकतात.

किल्ल्याशिवाय, आजूबाजूचा परिसर जलक्रीडा, स्नॉर्कलिंग आणि स्कूबा डायव्हिंगसाठी संधी देते, जे साहसी प्रेमी आणि निसर्गप्रेमींना आकर्षित करते.


जतन आणि संवर्धन:


सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ने किल्ल्याची संरचनात्मक अखंडता पुनर्संचयित आणि राखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. संवर्धन प्रकल्पांमध्ये तटबंदीची दुरुस्ती, मंदिराचा जीर्णोद्धार आणि किल्ल्याच्या दीर्घकालीन जतनाची खात्री करून पर्यटनाच्या सुविधेसाठी मार्ग तयार करणे समाविष्ट आहे.



About Author:

allmarathiinfo04 या ब्लॉगवर तुम्हाला निबंध, भाषण, अनमोल विचार, आणि वाचण्यासाठी कथा मिळेल. तुम्हाला काही माहिती लिहायचं असेल तर तुम्ही आमच्या ब्लॉगवर लिहू शकता.

Comments

Post a Comment

These website is not government he is private website.

Popular posts from this blog

मुरुड जंजिरा | Murud Janjira.

Independence day | भारतीय स्वातंत्र्य दिन