शिवनेरी किल्ला | Shivneri Fort.
नमस्कार मित्रांनो, allmarathiinfo04 मध्ये आपले स्वागत आहे. आजच्या लेखात आपण शिवनेरी किल्ल्याची माहिती बघणार आहोत.
शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ, पुण्यापासून १०५ किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
नाव : शिवनेरी
उंची : ३५०० फूट
प्रकार : गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी : मध्यम
ठिकाण : पुणे जिल्हा,
महाराष्ट्र
जवळचे गाव : जुन्नर
डोंगररांग : नाणेघाट
सध्याची अवस्था : सर्वात चांगली
स्थापना : ११७०
१९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता.हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे.
या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे.
शिवनेरी अगदी जुन्नर शहरात आहे. जुन्नरमधे शिरतानाच शिवनेरीचे दर्शन होते. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे.
शिवनेरी किल्ल्याचा इतिहास –
जीर्णनगर’, जुन्नेर, आणि आता जुन्नर म्हणून परिचित असलेले हे गाव इसविसन पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. नहपाना या शक राजाची ही राजधानी होती. पुढच्या काळात सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नायनाट केला आणि जुन्नर परिसरात आपली सत्ता स्थापित केली. पुरातन मार्ग असलेल्या नाणेघाटातून फार मोठ्या प्रमाणात व्यापारी वाहतूक होत असे या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी गिरिदुर्गांची बांधणी केल्या गेली. सातवाहनांनी सत्ता स्थिर केल्यानंतर येथे अनेक लेण्या देखील खोदल्या असल्याचं आढळतं.शिवनेरी गड पुढच्या काळात चालुक्य आणि राष्ट्रकुटांच्या अधिपत्याखाली देखील होता. यादवांनी या ठिकाणी सुमारे 1170 ते 1308 या काळात आपले राज्य स्थापित केले होते. मलिक-उल-तुजार याने 1443 मध्ये यादवांना पराभूत करून येथे आपली सत्ता स्थापन केली. अश्या तऱ्हेने गड बहमनी राजवटीत आला. मलिक महंमद या मलिक-उल-तुजारच्या प्रतिनिधीने 1470 च्या सुमारास गडाला नाकाबंदी करून गड जिंकला. निजामशाहीची स्थापना झाली.इथली राजधानी 1493 च्या सुमारास अहमदनगरला स्थानांतरीत झाली. सुल्तान मुर्तजा निजामाने ई.स. 1565 साली कासीम या आपल्या भावाला शिवनेरी किल्ल्यावर कैद करून ठेवलं होतं. पुढे सुमारे 1595 साली जुन्नर प्रांत आणि शिवनेरी गड मालोजी राजे भोसले यांच्या ताब्यात आला. या दरम्यान जिजाबाईंच्या वडिलांची हत्या झाली, शहाजी राजांनी 1629 मध्ये ज्यावेळी जिजाबाई गरोदर होत्या तेंव्हा रातोरात 500 घोडेस्वार त्यांच्या समवेत जिजाबाईंना शिवनेरी गडावर नेले.गडावर शिवाई देवीचे मंदिर होते, या शिवाईला जिजाबाई नवस बोलल्या. ‘आम्हाला पुत्र झाल्यास त्याला तुझे नाव ठेवेल‘. आई शिवाईने जिजाबाईंची प्रार्थना ऐकली आणि (19 फेब्रुवारी 1630) फाल्गुन वद्य तृतीयेच्या दिवशी शुक्रवारी सूर्य मावळल्यावर शिवनेरी गडावर शिवरायांचा जन्म झाला.जिजाबाईंनी 1632 साली लहानश्या शिवबासह शिवनेरी गड सोडला. 1637 साली हा गड पुन्हा मोगलांच्या ताब्यात गेला, पुढे 1650 साली महादेव कोळ्यांनी आणि 1678 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मोगलांच्या तावडीतून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. तब्बल 38 वर्षांच्या कालखंडानंतर हा किल्ला शाहू महाराजांनी 1716 मध्ये मराठेशाहीत आणला आणि त्यानंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित झाला.
शिवनेरी किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे -
1) सात दरवाजे
शिवनेरी किल्ल्यावर येतांना 7 दरवाजे लागतात.
पहिला दरवाजा हा महादरवाजा, दुसरा दरवाजा म्हणजे गणेश दरवाजा, तिसरा दरवाजा हा पीर दरवाजा, चौथा दरवाजा म्हणजे हत्ती दरवाजा, पाचवा दरवाजा हा शिपाई दरवाजा, सहावा दरवाजा म्हणजे फाटक दरवाजा(कुलूप दरवाजा) आणि सातवा दरवाजा म्हणजे कुलाबकर दरवाजा (मेना दरवाजा)असे शिवनेरी किल्ल्यावर सात दरवाजे आहेत.
2) प्रवेशद्वार-
शिवनेरी गडावरील प्रवेशद्वार म्हणजे महादरवाजा हा पेशव्यांनी बांधला असे म्हटले जाते. हा गडावरील पहिला दरवाजा आहे.कारण की महादरवाज्याची बनावट ही पेशवेकालीन आहे.
महादरवाज्याला बुरुज आणि चढण्यासाठी पायऱ्या आहेत.
3) तानाजी मालुसरे उद्यान -
शिवनेरी गडावर गेल्यानंतर पीर दरवाजा पार केल्यानंतर आपल्याला तानाजी मालुसरे उद्यान देखील पाहायला मिळते जे गडाच्या डाव्या बाजूला आहे.
4) शिवाई देवीचे मंदिर-
शिवनेरी किल्ल्यावर एकूण सात दरवाजे आहेत त्यामधील पाचवा दरवाजा मधून आत गेल्यावर उजव्या बाजूने शिवाई देवीचे मंदिर लागते.
पाचवा दरवाजाला शिपाई दरवाजा सुद्धा म्हटले जाते
5)बुद्धांचे लेणी-
मंदिरापासून काही पुढे गेल्यानंतर आपल्याला दगडामध्ये कोरलेल्या काही लेण्या देखील पाहायला मिळतील.
6) शिवाजी महाराजांचे जन्म घर-
शिवनेरी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला हे आपल्या सर्वांना माहित आहे.तेथे गेल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या इमारतीमध्ये झाला ती इमारत पाहायला मिळते.हि इमारत २ मजली आहे आणि खालच्या मजल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
येथे किल्ल्याच्या आत जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे आहेत.
7) बदामी तलाव -
गडाच्या मध्यभागी बदामी आकाराचा तलाव आहे म्हणून त्याला बदामी तलाव असे म्हणतात व तिथे दोन अशा बसण्याच्या जागा आहे जिथे आधीच्या काळात उन्हाळ्यात थंडगार वाटेल अशी व्यवस्था आहे.बदामी तलावाच्या मध्यभागी एक खांब आहे ज्यांनी पाहिले तलावाच्या पाण्याची पातळी मोजली जात होती
8) कडेलोट टोक-
बदामी तलावाच्या थोडेसे पुढे गेले कि कडेलोट टोक आहे याची उंची जवळ जवळ १५०० फुट आहे.कडेलोट टोकाचा वापर गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी पूर्वीच्या काळी केला जात होता.
9) गंगा जमुना टाकी-
शिवनेरी गडावर दोन पाण्याच्या टाक्या आहेत ज्यांना गंगा आणि जमुना टाकी असे म्हटले जातात.
10) अंबरखाना -
गडाचे सर्व दरवाजे पार केल्यानंतर लगेचच लागतो तो अंबरखाना या अंबरखाण्याचा वापर पूर्वीच्या काळी धन्य ठेवण्यासाठी केला जात होता पण आत्ता तो पडलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतो.
11) शिवकुंज -
शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे स्मारक आहे ज्याला शिवकुंज असे म्हटले .
छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जिजामाता यांची पण मूर्ती पाहायला मिळते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवनेरी किल्ला कधी सोडला-
इसवी सन 1630. इ.स. 1632 मध्ये जिजामाताने काही कारणांमुळे छत्रपती शिवाजी महाराजसह शिवनेरी किल्ला सोडला आणि 1637 मध्ये शिवनेरी किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी कसे पडले -
इ.स. 1595 मध्ये शिवनेरी किल्ला आणि जुन्नरचा भाग मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला.जिजामाता यांचे वडील लखुजी जाधव यांच्या हत्येनंतर 1629 मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजी महाराजांनी त्यांना 500 स्वार त्यांच्या सोबत देऊन रातोरात शिवनेरी किल्ल्यावर पाठवले.शिवनेरी किल्ल्यावर श्रीभवानीमाता शिवाई ला जिजामाताने नवस केला जर पुत्र झाला तर तुझें नाव ठेवीन म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी असे पडले.
शिवनेरी ला कसे जायचे-
शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी पायथ्याशी असणाऱ्या जुन्नर शहरांमध्ये प्रथम यावे लागते.
पुणे मार्गे:
पुण्यावरून येण्यासाठी नाशिक फाटा मार्गे चाकण मंचर नारायणगाव मार्गे जुन्नर ला येता येते जुन्नर मधील शिवरायांच्या पुतळ्यापासून डाव्या बाजूला जाणारी वाट गडावर जाते.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणाऱ्यांसाठी पुण्यातून राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बसेस जुन्नर मार्गे जात असतात त्यामध्ये नाशिक सटाणा आळेफाटा जुन्नर या बसेस चा समावेश होतो.
मुंबई मार्गे:
मुंबईवरून येणारे पर्यटक माळशेज घाट मार्गे किंवा तळेगाव मार्केट ला येऊ शकतात.
एसटीने येणारे मुंबई नगर बसने आळेफाटा येथे उतरून जुन्नर ला येऊ शकतात.
रेल्वे मार्ग:
मुंबई-पुणे लोहमार्गा वरील खडकी हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे.
काय काळजी घ्यावी:
किल्ला पाहण्यासाठी साधारण चार तास लागतात. गडावर पाण्याची बारमाही व्यवस्था आहे.शिवकुंज याच्या मागील शेडमध्ये दहा ते बारा जणांची राहण्याची सोय होऊ शकते. गडावर जेवण व नाश्त्याची सोय नाही ती गडाच्या पायथ्याशी होते.
निष्कर्ष -
आजच्या या लेखात आपण शिवनेरी किल्ला माहिती मराठी जाणून घेतली तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा
About Author:
Comments
Post a Comment
These website is not government he is private website.