तोरणा किल्ला मराठी माहिती | Torana Fort Marathi Eassy.
नमस्कार मित्रांनो, allmarathiinfo04 मध्ये आपले स्वागत आहे. आजच्या लेखामध्ये आपण तोरणा किल्ला याची माहिती बघणार आहोत.
allmarathiinfo04 |
छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या सवंगड्यांसोबत रायरेश्वरांच्या मंदिरात स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडे असल्या कारणामुळे त्याचे नाव तोरणा असे पडले.
तोरणा किल्ल्याची माहिती-
तोरणा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री पर्वतरांगांमधील डोंगरी किल्ला आहे.
नाव : तोरणा
उंची : १४०३ मीटर/
४६०६ फुट
प्रकार : गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी : मध्यम
ठिकाण : वेल्हे तालुका,
पुणे जिल्हा,
महाराष्ट्र भारत
जवळचे गाव : वेल्हे
डोंगररांग : सह्याद्री
सध्याची अवस्थ : चांगली
स्थापना :१४७० ते १४८६
तोरणा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक डोंगरी किल्ला आहे. तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, पैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत. दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात. पुण्याच्या नैऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये १८.२७६०७६३ उत्तर अक्षांश व ७३.६२२२६३५ पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे. याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत.
तोरणा किल्ल्याचा इतिहास -
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना म्हणजे इ.स. 1647 मध्ये त्यांना जिंकून घेतलेला पहिला किल्ला म्हणजेच हा ” तोरणा किल्ला “ होय. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव ” तोरणा किल्ला ” असे ठेवण्यात आले.
तोरणा किल्ल्याचा प्रचंड विस्तार असल्यामुळे गडाची बांधणी करताना त्यांनी तोरणा किल्ल्याचे नाव बदलून ” प्रचंडगड ” असे ठेवले. या तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग महाराजांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला. तोरणा किल्ल्याची बांधणी कोणी केली हे आजवर कळाले नाही पण या किल्ल्याची स्थापना ही इ.स. 1470 ते इ.स. 1486 च्या सुमारास झाली असावी.
येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरुन असा अनुमान काढला की, हा तोरणा किल्ला पूर्वी शैवपंथाचा आश्रम असावा. इ.स. 1470 ते इ.स. 1486 व्या दरम्यान बहामनी राजवटीचा राजा मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला.
त्यानंतर पुढे हा तोरणा किल्ला निजामशाहीत गेला. व पुढे शिवाजी महाराजांनी जिंकून या किल्ल्याचे नाव प्रचंडगड ठेवले आणि गडावर काही इमारती बांधल्या.जेव्हा शिवाजी महाराज आग्राहुन परतले तेव्हा त्यांनी अनेक किल्ल्यांची डागडुजीचे काम केले. त्यात त्यांनी 5 हजार होन इतका खर्च तोरणा किल्ल्यासाठी केला. पुढे संभाजी महाराजांच्या हत्तेनंतर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.
शंकराजी नारायण सचिवांनी तोरणा पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला पुढे इ.स. 1704 मध्ये औरंगजेबाने तोरणा किल्ल्याला वेढा घातला व लढाई करुन तो किल्ला स्वतःच्या ताब्यात घेतला. व तोरणा किल्ल्याचे नाव फुतुउल्गेब म्हणजेच दैवी विजय असे ठेवले.पुढे चार वर्षे हा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात होता त्यानंतर सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर मावळे चढवून पुन्हा हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आणला व त्यानंतर तोरणा किल्ला कायमचा स्वराज्यातच राहिला.
पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा किल्ल्याचा समावेश नव्हता हा तोरणा किल्ला शिवाजी महाराजांकडे राहिला होता.
तोरणा किल्ल्याची विशेषता म्हणजेच औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला हा तोरणा केला होता.
तोरणा किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे :
1 ) तोरणजाई देवी मंदिर :
तोरणा किल्ल्यावरील कोठी दरवाज्या समोरच्या दगडी चिरेबंदी तटामध्ये एक छोटे मंदिर आहे. त्यामध्ये तोरणजाई देवीची मूर्ती आहे. याच ठिकाणी खोदाई करत असताना मराठी मावळ्यांना मोहरांचे हंडे सापडले होते
2) मेंगाई देवी मंदिर :
तोरणा किल्ल्यावर मेंगाई देवीचे प्राचीन मंदिर आहे. रात्री मुक्कामी येणारे दुर्गप्रेमी याच मंदिरात राहतात. तसेच नवरात्र उत्सव काळात, वेल्हे गावातील लोक गडावरती देवीचा उत्सव साजरा करतात.
मेंगाई देवीच्या मंदिरापासून झुंजार माचीकडे जाताना हनुमान बुरुज, भेल बुरुज, सफेली बुरुज, माळेचा बुरुज, फुटका बुरुज आणि लक्कडखाना आहे.
3) झुंजार माची :
मेंगाई देवीच्या मंदिराकडून हनुमान बुरुजाकडे आल्यानंतर बुरुजांच्या तटावरुन खाली उतरल्याने दिंडीच्या दाराने झुंजार माचीकडे जाता येते. झुंजार माचीकडे जाणारी वाट ही खूप कठीण आहे.
4) तोरणेश्वर महादेव मंदिर :
झुंजार माचीकडे जाणाऱ्या रस्त्यात तोरणेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरात पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात धुके असते.
5) बुधला माची :
गडाच्या पश्चिम दिशेला बुधलामाची आहे. बुधला माचीच्या टोकाला चित्ता दरवाजा आहे. बुधला माचीकडून किल्ल्याकडे येत असताना कोकण दरवाजा, टकमक बुरुज, शिवगंगा, पातळगंगा टाके दिसतात.
6)बालेकिल्ला :
बालेकिल्ला म्हणजे तोरणा किल्ल्यावरील सर्वात उंचावरची जागा आहे. मेंगाई देवीच्या मंदिराकडे या बालेकिल्ला चे अवशेष बघायला मिळतात.
गडावर जाण्याचा मार्ग -
पुणे जिल्ह्यातील वेल्हे हे तालुक्याचे गाव तोरणाच्या पायथ्याशी आहे. पुणे-वेल्हे अंतर ६० कि.मी आहे. पुणे-नसरापूर-वेल्हे, पुणे-पानशेत-वेल्हे व पुणे-खानापूर-पाबे मार्गे वेल्हे अशा मार्गांनी तोरणा गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. शिवाजी महाराजांच्या काळातील वेल्हे-वेग्रे आळीमार्गे पाऊलवाटेने दीड-दोन तासात बिनी दरवाजातून तोरण्यावर जाता येते. हा मार्ग इतर मार्गांपेक्षा सोपा आहे. अवघड ठिकाणी पुरातत्त्व खात्याने लोखंडी संरक्षक कठडे बसवले आहेत. त्यामुळे सहज चढउतार करता येते. दुसरा मार्ग वेल्ह्यापासून ५ कि.मी अंतरावर असलेल्या भट्टी या गावातून आहे. गावाच्या पश्चिमेकडून वाळणजाई दरवाजातून बुधला माचीवर थेट वाट जाते. या वहिवाटीच्या वाटांशिवाय चोरवाटेने येणारे अन्य मार्ग अडचणीचे आणि धोकादायक बनले आहेत. वेल्हे गावातून चढताना दिसणारा तोरणा आणि गुंजवण्याकडून दिसणारा राजगड यात बरेच साम्य आहे.
About Author:
Nice
ReplyDelete