झाशीची राणी लक्ष्मीबाई | Zashichi Rani Laxmibai

 नमस्कार मित्रांनो allmarathiinfo04  मध्ये आपले स्वागत आहे . आजच्या लेखामध्ये आपण झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची माहिती बघणार आहोत . आपल्या पवित्र अशा भारत भूमीत बरेच शूर पराक्रमी झुंजार युद्ध जन्माला आले, या शूरवीरांमध्ये एक अशी राणी होऊन गेली, आपल्या साम्राज्याला इंग्रजांच्या हाती जाण्यापासून वाचवण्याकरिता त्यांच्याशी कडवी झुंज दिली.. 

झाशी ला वाचवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. राणी लक्ष्मीबाई 1857 च्या स्वातंत्र्य समरातील शूर वीरांगना…उत्तर मध्य भारतात असलेल्या झाशी या मराठा शासित राज्याची राणी. मिळालेल्या अल्प आयुष्यात ब्रिटीश साम्राज्याशी लढा देत त्यांनी रणसंग्राम पुकारला होता.

allmarathiinfo04

टोपण नाव        : मनिकर्णिका, मनू , बाईसाहेब ,   छबिली.

  जन्म               : 19 नोव्हेंबर 1835 काशी  भारत

  मृत्यू                : 17 जून 1858 (वय 22) ग्वालियर, मध्य प्रदेश

  चळवळ           : 1857 चे  स्वातंत्र्य युद्ध

 प्रमुख स्मारके    : ग्वाल्हेर

धर्म                   : हिंदू

वडील              : मोरोपंत तांबे                

आई                :   भागीरथीबाई तांबे,चिमणाबाई   तांबे

  पती               : श्रीमंत गंगाधरराव नेवाळकर  

 अपत्य             : दामोदर, आनंदराव  (दत्तक पुत्र) 

                       

बालपण  -

महाराणी लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका होते. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे भट्ट. ते रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील गुढे गावचे होते. साताराच्या धावडशी येथील ब्रम्हेंद्र स्वामींनी तांबे ना सेवेत रुजू करून घेतले होते. मुळ पुरुषाची समाधी मंदिराच्या परिसरात आहे. नंतर काही मंडळी दक्षिणेकडे गेली, कोट, कोलधे, खेडकुळी या भागात राहिली. तर कृष्णाजी, बळवंतराव, मोरोपंत आणि सदाशिव हे पुणे, काशी, बिठूर आणि झाशीला वास्तव्यास राहिले. आज काही वंशज नागपूर व साताऱ्यात आहे. तांबेचा पानिपत युद्धात ही सहभाग होता.

राणीचा जन्म मोरोपंत तांबे आणि भागीरथीबाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे १९ नोव्हेंबर १८३५ झाला.

जन्मतिथी : श्री चंद्रगुप्त विक्रमादित्य सवंत १८९२ श्रीनृप शालिवाहन शक १७५७ मंमथ संवत्सर स्वस्तिश्री राज्याभिषेक शक १६१ कार्तिक कृष्ण पक्ष चतुर्दशी वार गुरुवार दिनांक १९ नोव्हेंबर १८३५ रात्री ३.४० काशी, वाराणसी, उत्तर प्रदेश.


तांबे हे मुळनिवासी गुढे ग्राम, रत्‍नागिरी येथील होते. व्यवसायानिमित्त पुणे व सातारा येथे स्थायी झाले. तर नेवाळकर मुळनिवासी कोट ग्राम, रत्‍नागिरी येथील होते. पेशव्यांनी त्यांना जळगावच्या पारोळा येथील जहागीर दिली. व कालांतराने झाशी संस्थानची सुभेदारी दिली. इ.स. १८१८ नंतर इंग्रजांशी तह करून नेवाळकरांनी झाशी वंशपरंपरागत घेऊन "महाराजा" ही पदवी धारण केली.


विवाह  -

तिने १८४२ मध्ये उत्तर भारतातील झाशी राज्यातील महाराज गंगाधर राव नेवलेकर यांच्याशी विवाह केला आणि नंतर ती झाशीची राणी बनली. त्यावेळी ती फक्त १४ वर्षांची होती. लग्नानंतर तिला ‘लक्ष्मीबाई’ हे नाव पडले. त्यांचे लग्न झाशीच्या जुन्या गणेश मंदिरात पार पडले. तिने १८५१ मध्ये एका मुलाला जन्म दिला, त्यांचे नाव दामोदर राव होते, परंतु तो फक्त चार महिने जगला.

महाराज गंगाधर राव नेवलेकर हे त्यांच्या मुलाच्या मृत्यूतून कधीच बरे झाले नसल्याची नोंद आहे आणि १८५३ मध्ये महाराज आजारी पडल्यावर त्या दोघांनी एका नातेवाईकाचा मुलगा [महाराज गंगाधर राव यांचे भाऊ] दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. कारण ब्रिटीश सरकारने मुलाच्या वारसावर कोणताही आक्षेप घेऊ नये म्हणून ही नोकरी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. या मुलाचे मूळ नाव आनंद राव होते, परंतु नंतर ते बदलून दामोदर राव ठेवण्यात आले.

"मेरी झांसी नही दुंगी" पराक्रमी लक्ष्मीबाई च्या संघर्षाला सुरुवात -

झाशी ताब्यात घेण्याचा चंग बांधलेल्या ब्रिटीशांनी 7 मार्च 1854 ला सरकारी आदेश काढला, ज्यात झाशी राज्याला ब्रिटीश साम्राज्यात समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राणी लक्ष्मीबाईंनी या आदेशाचे उल्लंघन करत “मै अपनी झांसी नही दुंगी” असे ब्रिटीशांना कळवले आणि त्यांच्या विरोधात संघर्ष अधिक तीव्र केला.


लक्ष्मीबाईंनी इतर राज्यांच्या मदतीने सेना तयार केली, या सेनेत लोकांनी मोठ्या उत्साहाने आपला सहभाग नोंदवला. या सैन्यात महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता, त्यांना युद्धाचे विशेष प्रशिक्षण दिल्या गेले. लक्ष्मीबाईंच्या या सैन्यात युद्ध कुशल आणि विद्वान असे गुलाम खान, दोस्त खान, खुदाबक्श, सुंदर-मुंदर, काशीबाई, मोतीबाई, लालाभाऊ बक्षी, दिवाण रघुनाथ सिंह, दिवाण जवाहर सिंह यांच्या समवेत 1400 सैनिक सहभागी होते.


इ. स. 1857 चे स्वातंत्र्य युद्ध व हुतात्मा -

इ.स. १८५७चा उठाव हा संपूर्ण हिंदुस्थानात झाला. त्याप्रमाणे ५ जून, १८५७ ला झाशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ ३५ शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या. पुढे २२ जुलै, इ.स. १८५७ ला ब्रिटिशांनी राणींना झाशीची अधिकारसूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या, परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता. मनुष्यबळ नव्हते आणि खजिनाही रिकामाच होता. प्रजेच्या मनात असुरक्षित भविष्याबद्दल भीती होती. परंतु तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने परिस्थिती हाताळली. जुन्या विश्र्वासातील लोकांना परत बोलावून त्यांना काही अधिकाराची पदे दिली. दिवाण लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री, तर प्रत्यक्ष वडिलांना - मारोपंत तांब्यांना - खजिनदार केले. लक्ष्मणरावांचा भाऊ, मुलगा तसेच मुन्सफ, भोलानाथ, आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे व शस्त्रास्त्रांच्या जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकुरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळविले; राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या २२ तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मितीही सुरू केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणाऱ्या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. परकीयांविरुद्ध लढण्याची तयारी करीत असतानाच राणींनी प्रजेचा स्वाभिमान, निष्ठा वाढवण्याचा व आनंद जपण्याचा प्रयत्न केला. दानशूर, श्रद्धाळू व दयाळू लक्ष्मीबाईंनी थंडीत कुडकुडणाऱ्या हजार-दीड हजार गरिबांना, साधू-संन्याशांना उबदार कपड्यांचे वाटप केले. स्वतःबरोबर प्रजेच्या श्रद्धा जपणाऱ्या राणीने गोवध बंदी केली. त्यांनी किल्ल्यावर रंगपंचमीसारखा सण साजरा करून स्त्रियांसाठी हळदी-कुंकवाचे कार्यक्रम केले.

अशा प्रकारे प्रशासन, सैन्य व कल्याणकारी कामे यांची चोख व्यवस्था लावून स्वराज्य असल्याचा विश्र्वास राणी लक्ष्मीबाईंनी जनतेत निर्माण केला. प्रजेला मुक्त मनाने आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी, त्यांच्या कलेची जोपासना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी झाशीमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग घडवून आणले. मराठी भाषिकांसाठी रासक्रीडा, चित्रलेखा, बाणासूर इ. नाटके योजली. स्वतःही नाटकांचा आनंद घेतला. एक स्थिर, सुरक्षित, समृद्ध व सुसंस्कृत राज्य घडवण्याचा प्रयत्न राणी लक्ष्मीबाईंनी केला. यामुळे राणी आणि झाशीतील प्रजा यांच्यातील नाते दृढ झाले.


दरम्यान २१ मार्च, इ.स. १८५८ ला सकाळीच सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झाशीजवळ आला. त्याने राणीस निःशस्त्र भेटीस यावे किंवा युद्धास तयार राहावे असे कळविले. ब्रिटिशांनी केलेल्या विश्र्वासघातामुळे, अन्यायामुळे ‘भारतात विदेशी शासन नकोच’ अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्याचे नाकारले. त्याच वेळी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्यास सुचविले.

उत्तम प्रतीचा सेनानी आणि कर्तबगार राजकारणी असणाऱ्याया ह्यू रोजने झाशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजुबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळविला. त्या टेकड्यांवर तोफा चढवल्या. २-३ दिवस झाशीची बाजू अभेद्य होती. घनगर्ज,नालदार,भवानीशंकर,कडक बिजली या तोफा आपल्या नावाप्रमाणे कार्यरत होत्या. "गौसखान" याने तर तोफेमधून असा मारा केला, की त्यामुळे दोन शिवमंदिरे वाचली. या गोष्टीसाठी आजही झाशीतील लोक त्याला धन्यवाद देतात. युद्धाच्या ९ व्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफ बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारे पाडली. ही खिंडारे बुजवण्यासाठी रातोरात काम केले गेले. त्या वेळी चुना, दगड, विटा यांची ने-आण करण्याचे काम स्त्रियांनी केले होते हे विशेष.


शेवटी ब्रिटिशांना फितुरांनीच साथ दिली. झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहिरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा व्हायचा, ती विहीर आणि जिथे दारुगोळा तयार व्हायचा, तो कारखाना, ही दोन ठिकाणे इंग्रजांनी उद्ध्वस्त केली. अशा स्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणाऱ्या मदतीवर होती. त्याप्रमाणे ३१ मार्चला तात्या टोपेंचे सैन्य आले. परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. 

राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावरच लढण्याचे आवाहन केले. एवढेच नाही तर ‘रणांगणात तुम्हाला मृत्यू आला, तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन’ असे आश्र्वासन दिले. राणीचे डावे-उजवे हात असणारे "खुदाबक्ष आणि गौसखान" इंग्रजांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडल्यावर मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत, सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला व तो अंमलात आणला. संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती, की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य, शौर्य, आवेश पाहून ह्यू रोजही थबकला. तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन लक्ष्मीबाईंना परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकाऱ्यांशी लक्ष्मीबाईंनी चर्चा केली आणि निर्णयानुसार रातोरात त्यांनी झाशी सोडले. सतत ११ दिवस राणींनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले. लढाईचा साक्षीदार ह्यूज रोजनेही म्हटले की ‘राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती.’


झाशी पराभवानंतर ३ एप्रिलच्या मध्यरात्री राणी लक्ष्मीबाई सारंगी घोडीवर स्वार होऊन दामोदररावास पाठीशी बांधून किल्यावरू खादी उडी मारून काल्पीला गेल्या. कोंच , काल्पी पराभवानंतर त्या रावसाहेब पेशव्यांबरोबर ३०-३१ मे १८५८ रोजी ग्वाल्हेरला आल्या. तेथेही स्वस्थ न बसता लक्ष्मीबाईंनी आपल्या सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैन्यांमध्ये फिरून, सैनिकांची चौकशी करीत, इंग्रजांना रोखण्यासाठी कशा प्रकारे मोर्चे बांधणी करावी याविषयी त्यांनी चर्चा केली. याच वेळी १७ जून इ.स. १८५८ रोजी सकाळीच ब्रिटिश अधिकारी स्मिथ सैन्यासह ग्वाल्हेरच्या अगदी जवळ कोटा की सराय येथे येऊन पोहोचला. त्याने त्वरित हल्ला चढवला. लक्ष्मीबाईंनी रणांगणात धाव घेतली. लक्ष्मीबाई तलवारीचे सपसप वार करीत समोर येणाऱ्या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या. आवेगाने, विजेसारख्या तळपणाऱ्या राणींकडे पाहून त्यांचे सैन्यही त्वेषाने लढले. इंग्रज अधिकारी स्मिथचे सैन्य मागे हटणारच होते, त्याच वेळी नव्या दमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली. दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर राणींचा निभाव लागला नाही. परिस्थिती ओळखून त्या काही स्वारांनिशी बाहेर पडल्या. थोडे पुढे जाताच एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा अडला. नेहमीचा सारंगी नावाची घोडी घोडा शेवटच्या लढाईत त्यांच्याबरोबर नव्हता. काही केल्या घोडा ओढा ओलांडत नव्हता. तिथे इंग्रजांशी लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्‍तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. त्यांचा डाव्या कुशीतही तलवार घुसली, परंतु पुरुषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज ओळखू शकले नाहीत. ते पुढे निघून गेले. घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना सेवक रामचंद्र देशमुखांनी फुलबाग येथील बाबा गंगादास यांच्या मठात आणले. परंतु त्यांची उपचार करण्याची इच्छा नव्हती. आपला देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती.

काल्पी येथील युद्ध -

झाशी येथील युद्धात हार झाल्यानंतर लक्ष्मीबाई ने तात्या टोपे व आपल्या दलासोबत जवळ पास 24 तासाच्या प्रवासात 102 किलोमीटर अंतर पार केले. व त्या काल्पी येथे येऊन पोहचल्या. तेथील पेशव्याने परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना शरण दिली व आपले सैन्य बलही उपलब्ध करून दिले.

22 मे 1858 मध्ये इंग्रज अधिकारी सर ह्यु रोज याने काल्पी वर आक्रमण केले. तेव्हा राणी लक्ष्मीबाई ने अदभुत वीरता दाखवत त्यांना हरवले. काही काळानंतर सर ह्यु रोज ने पुन्हा एकदा आक्रमण केले परंतु या वेळी लक्ष्मीबाई ला पराभवाचा सामना करावा लागला.

युद्धात हरल्यानंतर लक्ष्मीबाई ने आपल्या प्रमुख सैनिकांना ग्वालियर वर अधिकार प्राप्त करण्यास सांगितला. तात्या टोपे व इतर प्रमुख सैनिकांना एकत्रित करून लक्ष्मीबाई ने ग्वालियर आक्रमण केले. ग्वालियर च्या राजाला पराजित करून हे राज्य काल्पी च्या पेशव्याच्या स्वाधीन केले.


राणी लक्ष्मीबाई यांचा मृत्यू -

१७ जून १८५८ रोजी राजाच्या रॉयल आयरिश विरुद्ध युद्ध करताना त्याने ग्वाल्हेरच्या पूर्वेकडील प्रदेशाचा मोर्चा घेतला. या लढाईत तिचे नोकर देखील सामील होते आणि पुरुषांची काळजी घेताना तीही अशाच शौर्याने लढत होती. संघर्षाच्या वेळी, ती तिच्या घोड्यावर स्वार होत नव्हती, ‘राजरतन’, जो नवीन होता आणि कालव्याच्या पलीकडे उडी मारू शकत नव्हता.

तरीही, राणीने परिस्थिती ओळखली आणि पराक्रमाने लढा दिला. त्यावेळी ती खूप जखमी झाली आणि घोड्यावरून पडली. इंग्रज सैनिक तिला ओळखू शकले नाहीत कारण ती पुरुष पालकांच्या देखरेखीखाली होती आणि तिला सोडून दिले. राणीच्या विश्वासू सैन्याने तिला जवळच्या गंगादास मठात नेले आणि तिला गंगाजल अर्पण केले.

“कोणत्याही ब्रिटीश अधिकाऱ्याने त्याच्या मृतदेहाला हात लावू नये,” तो त्याची अंतिम इच्छा म्हणून म्हणाला. अशाप्रकारे, तिने कोटाच्या सराईजवळील ग्वाल्हेरच्या फुलबाग जिल्ह्यात हौतात्म्य प्राप्त केले, किंवा मृत्यू झाला. तीन दिवसांनंतर ब्रिटिश सरकारने ग्वाल्हेर ताब्यात घेतले होते. त्यांचे वडील मोरोपंत तांबे यांना पकडून मृत्यूदंड देण्यात आला.

   सिंहासन हिल उठे, राजवंशो ने भृकुटी तानी थी

बुढे भारत में भी आई, फिर सें नयी जवानी थी

गुमी हुई आजादी की किमत, सबने पहचानी थी

दूर फिरंगी को करने की, सबने मन में ठानी थी

चमक उठी सन सत्तावन में, वह तलवार पुरानी थी

बुंदेले हरबोलों के मुह, हमने सुनी कहानी थी

खूब लढी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी.


About Author:

allmarathiinfo04 या ब्लॉगवर तुम्हाला निबंध, भाषण, अनमोल विचार, आणि वाचण्यासाठी कथा मिळेल. तुम्हाला काही माहिती लिहायचं असेल तर तुम्ही आमच्या ब्लॉगवर लिहू शकता.

Comments

Popular posts from this blog

मुरुड जंजिरा | Murud Janjira.

सिंधुदुर्ग | Sindhudurg Fort.

Independence day | भारतीय स्वातंत्र्य दिन