दौलताबाद | Daulatabad Fort.

 नमस्कार मित्रांनो, allmarathiinfo04  मध्ये आपले स्वागत आहे आजच्या लेखांमध्ये आपण दौलताबाद किल्ल्याची संपूर्ण माहिती बघणार आहोत.

Allmarathiinfo04 


महाराष्ट्र म्हणजे किल्ल्यांची भूमी. येथे अनेक प्रसिद्ध किल्ले पाहायला मिळतात. उपलब्ध माहितीनुसार महाराष्ट्रात सुमारे ३०० पेक्षा जास्त किल्ले आहेत. यांमध्ये अजिंक्यतारा, शिवनेरी, पन्हाळगड,  रामशेज गड आणि इतर किल्ल्यांचा समावेश होतो.

याच प्रसिद्ध किल्ल्यांमध्ये आणखी एक नाव म्हणजे दौलताबादचा किल्ला. याला देवगिरीचा किल्ला म्हणून देखील ओळखतात. औरंगाबाद जिल्ह्यात असणारा हा किल्ला इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार आहे. चला तर पाहू या दौलताबाद किल्ल्याची माहिती –


किल्ल्याचे       - दौलताबाद

नाव

जिल्हा           - औरंगाबाद

स्थापना         - इ. स. ११८७

संस्थापक       - यादव राजा

                     भिल्लमा

प्रकार            - गिरीदुर्ग

क्षेत्रफळ          - ९४ एकर

किल्ल्याची       - २९७५ फुट

उंची

किल्ल्यावरील    - यादव , 

मुख्य वंश            खिलजी 

                       आणि

                        तुघलक


दौलताबाद किल्ल्याचा इतिहास -

१२वे शतक


बदामीचे चालुक्य, कल्याणीचे चालुक्य, मौर्य, शुंग, सातवाहन, हल(हाला), शक क्षत्रप, सातकर्णी, वाकाटक, नल, विंध्यसेना, प्रवरसेना, राष्ट्रकूट यांच्यानंतर बाराव्या शतकाच्या शेवटच्या २५ वर्षात देवगिरीच्या यादवांचा उदय खान्देश परिसरात झाला. पहिल्या सेऊनचंद्राच्या सेऊनदेशात (आताचा खान्देशात) नाशिक ते देवगिरीचाही समावेश होता. कृष्णा नदीच्या उत्तरेकडे वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या या यादव वंशातील पाचवा भिल्लमा या राजपुत्राने देवगिरी शहराची स्थापना करून पुढे तेथून राज्य चालवले.


पुढे सिंघण्णा व त्यानंतर त्याचा नातू कृष्ण यांनी राज्य वाढवले. या कृष्णाचा भाऊ महादेव याची अचूक (जन्म?)तारीख २९ ऑगस्ट १२६१ अशी असल्याचे निश्चित झाले आहे. त्याने उत्तर कोकणाचा प्रदेश आपल्या राज्यास जोडण्यात यश प्राप्त केले आणि गादी आपला मुलगा आमण्णाकडे सोपविली. पण कृष्णाचा मुलगा रामचंद्राने बंड करून गादी स्वतःकडे घेतली आणि विदर्भ आणि इतरत्रही विजय प्राप्त केले. मात्र, १२९६ मध्ये झालेल्या अल्लाउद्दीन खिलजीच्या आकस्मिक हल्ल्यास रामचंद्र तोंड देऊ शकला नाही .


इ.स. १३२७ ते इ.स. १३९७


इ.स. १३२७ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी या उत्तरेतील सुल्तानाने दख्खन प्रांतात क्रूर आक्रमण करून हिंदूंना लक्ष्य केले. देवगिरीच्या यदवांनी मोठा कठिण लढा दिला. अनेक लढाया यादव जिंकले. यादवांच्या लढाऊ बाण्यामुळे अल्लाउद्दीन खिलजीला ही मोहीम सोडून द्यावी लागली. तरीही किल्ला सोडला आणि क्रूर मुस्लिम आक्रमकांनी महाराष्ट्राची संपत्ती लुटली. सेनापती मलीक कफूर याने अल्ला‍उद्दीनचे काम पुढे चालू ठेवले आणि इ.स. १३१० मध्ये यादवांची सत्ता लयाला गेली.


इ.स.१३१० ते इ.स.१३४७


अल्ला‍उद्दीनचे अनुकरण मुहम्मद बिन तुघलक (इ.स. १३२४-१३५०) या दिल्लीच्या सुलतानाने करून आपली सत्ता वाढविण्यासाठी दक्षिणेतील मदुरेपर्यंत आक्रमणे केली. १३२६ मध्ये मुहम्मद बिन तुघलक या दिल्लीच्या सुलतानाने आपली राजधानी देवगिरीवर आणली व देवगिरीचे नाव दौलताबाद केले. दिल्लीहून आपली राजधानी दौलताबादेस आणण्याचा त्याचा प्रयत्न असफल झाला. ही राजधानी परत दिल्लीला न्यावी लागली. राजधानीचे शहर म्हणून देवगिरीला एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न मोहम्मद तुघलकाच्या काळामध्ये झाला. मुहम्मद बिन तुघलक परत गेल्यावर किल्ल्याचे नाव पूर्ववतपणे देवगिरी झाले. देवगिरी किल्ल्यावर पंचधातूंनी बनवलेला एक तोफ आहे. तोफ किल्ल्यावर बनवली आहे. त्या तोफेमध्ये एक शहर उद्ध्वस्त करण्याची शक्ती आहे. या तोफेवरील कोरलेली माहिती ही पर्शियन भाषेत व लिपीत आहे .


इ.स. १३४७ ते इ.स.१५००


तुघलकांची सत्ता क्षीण झाल्यावर अल्ला‍उद्दीन हसन बहामनी याच्या अधिपत्याखाली दक्षिणेत इ.स. १३४७ साली बहामनी घराण्याची स्थापना झाली. ते राज्य सुमारे १५० वर्षे टिकले. देवगिरी अथवा दौलताबाद ही बहामनींची काही काळ राजधानी होती. सोळाव्या शतकात बहामनी राज्याचे गोवळकोंड्याची कुतुबशाही, अहमदनगरची निजामशाही, वऱ्हाडची/विदर्भाची/एलिचपूरची इमादशाही, विजापूरची आदिलशाही आणि बिदरची बरीदशाही अशा पाच स्वतंत्र राज्यांत विभाजन झाले. आपली सत्ता टिकविण्याकरिता या दख्खनी सुलतानांना प्रशासनासाठी स्थानिक मराठी लोकांचे मोठ्या प्रमाणावर साहाय्य घ्यावे लागले. सनदी सेवा, लष्करी चाकरी आणि राजनैतिक व्यवहार यासाठी प्रामुख्याने त्यांना मराठी माणसांचीच नेमणूक करावी लागली. सतराव्या शतकाच्या अंतापर्यंत या पाचही शाह्या मोगल साम्राज्यांत विलीन झाल्या. १७ व्या शतकाचा अखेरीस औरंगजेबाने येथे वास्तव्य केले होते.


महाराष्ट्राचे आश्चर्य  -


महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी देवगिरीचा किल्ला हे एक आश्चर्य ठरले आहे. महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली. शांती-सद्भावनेचे प्रतीक ग्लोबल पॅगोडा, मुंबईच्या मध्य रेल्वेचं मुख्यालय सीएसटी स्टेशन, मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला देवगिरीचा किल्ला, पश्चिम घाटातील कास पठार, स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ला, बुलडाण्यातील लोणार सरोवर, औरंगाबादमधील अजिंठा लेणी ही महाराष्ट्राची सात आश्चर्ये आहेत. जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात आश्चर्य निवडली गेली आहेत. हा पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध किल्ला आहे. जागतिक स्तरावर जशी सात आश्चर्ये निवडली गेली, त्याच धर्तीवर ‘एबीपी माझा’ ने महाराष्ट्रातूनही सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्रा कार्यक्रमाच्या माध्यमातून सात आश्चर्य निवडली. डॉ. जगदीश पाटील, डॉ. अरुण टीकेकर, राजीव खांडेकर, श्री. अरविंद जामखेडकर, डॉ. निशीगंधा वाड, श्री. विकास दिलावरी, श्री. व्ही. रंगनाथन या सात ज्युरीने निवडलेल्या १४ आश्चर्यांपैकी सात वंडर्सची निवड करण्यात आली.


विशेष म्हणजे त्या गडावरील मेंढातोफ आहे. ती तोफ अतिशय अद्भुत आहे, त्या तोफेचे खासियत म्हणजे तो तोफ एक माऱ्यात एखादा गड किंवा किल्ला उद्ध्वस्त करण्याची क्षमता त्या मध्ये आहे. ती तोफ पंच धात़ूंनी निर्माण केली आहे.

 


दौलताबाद किल्ल्याचे बांधकाम -

दौलताबाद किल्ला त्याच्या मोक्याच्या आणि मजबूत बांधकामामुळे देशातील सर्वोत्तम संरक्षित किल्ल्यांपैकी एक आहे. हा किल्ला २०० मीटर उंच शंकूच्या आकाराच्या ढिगाऱ्यावर आहे. आक्रमणकर्त्यांना बाहेर ठेवण्यासाठी, किल्ल्याचा खालचा अर्धा भाग मगरींनी भरलेल्या खंदकाने वेढलेला आहे.


देवगिरी किल्ल्याची निर्मिती अशा प्रकारे करण्यात आली होती की त्यात कोणताही विरोधक प्रवेश करू शकत नाही, जो स्वतःच असामान्य होता. एकच दरवाजा गडावर प्रवेश आणि बाहेर जाण्यासाठी दोन्ही मार्ग म्हणून काम करत असे.

संपूर्ण किल्ल्याभोवती अनेक बुरुज आहेत. तुघलक वंशाच्या कारकिर्दीत विविध तोफा जोडल्या गेल्या आणि प्रचंड संरचनेचे रक्षण करण्यासाठी ५ किमी लांबीची भिंत तयार करण्यात आली. तुघलक राजवटीच्या काळात किल्ल्याच्या आत ३० मीटर चांद मिनार बांधण्यात आला होता.


दौलताबाद किल्ल्याची प्रमुख वास्तू –


चीनी राजवाडा:


या महालांच्या बांधकामात पोर्सिलेन टाइल्सचा वापर करण्यात आला असल्याने दौलताबाद किल्ल्याचा ऐतिहासिक चिनी राजवाडा किल्ल्याच्या आत आहे. या विलक्षण किल्ल्याचे अप्रतिम बांधकाम प्रसिद्ध आहे. हा चिनी राजवाडा त्याच्या इतिहासाच्या पानांनुसार रॉयल जेल म्हणून तयार करण्यात आला होता. या चिनी किल्ल्यामध्ये मुघल आणि पर्शियन रचनेचे सुंदर संमिश्रण पाहायला मिळते. कुतुबशाही साम्राज्याचा अंतिम शासक गोलकोंडा येथे वास्तव्यास होता असे मानले जाते. या ठिकाणी अब्दुल हसन तानाशाहला औरंगजेबाने ठेवले होते.


चांद मिनार:


चांद मिनार दौलताबाद, जो देवगिरी किल्ल्याच्या आत वसलेला आहे आणि त्याची लांबी अंदाजे ६४ मीटर आणि रुंदी २१ मीटर आहे, ही एक आश्चर्यकारक आणि मोहक रचना आहे. अलाउद्दीन बहमनी याने दौलताबाद किल्ला ताब्यात घेतल्याच्या आनंदात चांदमिनार बांधला असे मानले जाते.

संपूर्ण देवगिरी किल्ला खजिन्याने भरलेला आहे. भारतीय इतिहासाचे वर्णन करणाऱ्या असंख्य ऐतिहासिक स्थळांचे साक्षीदार होण्यासाठी अनेक लोक या किल्ल्यावर येत असतात. देशभरातून आणि परदेशातील प्रवाशांच्या सततच्या ओघामुळे, अलाउद्दीन बहमनी याने जवळजवळ १४४५ साली ते बांधले.


दौलताबाद (देवगिरी) किल्ल्याची वैशिष्ट्ये -


किल्ल्यावरून कोणीही दुसऱ्या रस्त्याने बाहेर पडू शकत नाही, फक्त एकच प्रवेशद्वार आणि बाहेर जायचे ठिकाण. हे शत्रू सैनिकांना त्यांच्या स्वतःच्या धोक्यात बाहेर पडण्याच्या शोधात किल्ल्यात खोलवर जाण्यासाठी गोंधळात टाकण्यासाठी बनवले गेले होते.


कोणतेही समांतर दरवाजे नाहीत. हे आक्रमण करणार्‍या सैन्याची गती खंडित करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. पण किल्ल्याचे खरे दरवाजे उजवीकडे आणि खोटे डावीकडे आहेत, त्यामुळे शत्रू गोंधळात पडत असे.

प्रवेशमार्गांची गोंधळात टाकणारी रचना. शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी डिझाइन केलेले, खोटे, परंतु डाव्या बाजूला सुसज्ज गेट्सने शत्रू सैनिकांना आमिष दाखवले आणि त्यांना आत अडकवले आणि शेवटी त्यांना मगरींना खायला दिले जायचे.


टेकडीचा आकार एका गुळगुळीत एखाद्या कासवासारखा आहे. यामुळे या टेकडीवरून कोणत्याही सानिकाला वर येणे शक्य नव्हते.


वर्णन आणि इतिहास

संपादन करा

महाराष्ट्रात जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेण्यांव्यतिरिक्त अभिमान बाळगावा अशा अनेक वास्तू आहेत. यादवांची राजधानी असलेला देवगिरीचा दुर्ग म्हणजेच दौलताबादचा किल्ला हा त्यापैकीच एक आहे. रामदेवराय यादवांपासून निझामशाहीपर्यंत अनेक राजांचे कर्तृत्व पाहिलेला हा किल्ला औरंगाबादची शान आहे. औरंगाबादपासून सुमारे 15 किलोमीटरवर असलेल्या या किल्ल्याचे मूळ नाव देवगिरी असे आहे. देवगिरी या नावामागेही एक दंतकथा आहे.


एकदा शंकर-पार्वती सारिपाट खेळत होते. त्यात शंकर पराभूत झाले आणि रागारागाने वेरूळच्या अरण्यात निघून गेले. पार्वती भिल्लिणीच्या वेशात म्हैसमाळच्या डोंगरात राहू लागली. या भिल्लिणीवर शंकर अनुरक्त झाले आणि त्यांनी देवांना वेरूळ परिसरात येण्यास मनाई केली आणि जवळच असलेल्या ज्या डोंगरावर देव राहू लागले तो देवगिरीचा डोंगर होय. या डोंगरावर बांधलेला किल्ला म्हणून यास देवगिरीचा किल्ला म्हणतात.


राष्ट्रकूट राज्यातील श्रीवल्लभ याने इ.स. 756 ते 772 या काळात हा किल्ला उभारला. भारताच्या इतर कोणत्याही राज्यात दिसणार नाही असा हा किल्ला दक्षिणेच्या प्रवेशद्वारीच उभा असल्यामुळे दक्षिणेच्या इतिहासात त्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचा डोंगर 600 फूट उंचीचा असून त्याच्या भोवती 50 फूट रुंदीचा खोल पाण्याने भरलेला खंदक आहे. खंदकाच्या तळापासून 150 ते 200 फूट उंचीचा कडा इतका तासून काढलेला आहे की सापालाही वर चढून जाता येणे शक्य नाही.


महाद्वारातून प्रवेश केल्याबरोबर उजव्या बाजूस ‘चांदमिनार’ नावाचा मनोरा दिसतो. 21व्या शतकात मुस्लिम राज्यकर्त्यांनी उभारलेल्या या मनोऱ्याची उंची 210 फूट असून बुंध्याचा परीघ 70 फूट आहे. याला एकूण चार मजले आहेत. याच भागात ‘किल्ले शिकन’ नावाची एक तोफ ठेवलेली आहे. ही तोफ पंचधातूंची आहे. या तोफेला ‘मेंढा तोफ’ असेही म्हणतात. जवळच एक 180 स्तंभाचे हेमाडपंती मंदिर आहे. 1950 मध्ये लोकांनी स्वयंस्फूर्तीने येथे भारतमातेची मूर्ती स्थापन केली. या मंदिरासमोरच हत्ती हौद नावाचा 150 फूट लांब, 100 फूट रुंद आणि 23 फूट खोल असा विस्तीर्ण जलाशय आहे.


राजा रामदेव धान्य व दारूगोळा ठेवत असलेला काळाकोट पाहण्यासारखा आहे. याच धान्य गोदामामध्ये फितुरी झाली होती. तेथे धान्याऐवजी मिठाची पोती रचली गेली आणि भुकेल्यापोटी मराठी फौजेचा पराभव झाला. तसेच अल्लाउद्दीन खिलजीने दक्षिणेतील पहिले पाऊल दौलताबाद किल्ल्यावरच टाकले. यादव साम्राज्याची राजधानी असलेला हा किल्ला इ. स. 1318 मध्ये हरपाळदेवाला ठार मारून अल्लाउद्दीन खिलजीने ताब्यात घेतला. या किल्ल्याने खिलजी, तुघलक, बहामनी, मुगल, निझाम या घराण्यांचे स्वामित्त्व स्वीकारले होते. महंमद तुघलकाने तर इ. स. 1327 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीला आणली. त्यानंतर देवगिरीला दौलताबाद हे नाव दिले. 1950 मध्ये निझामाचे राज्य खालसा केल्यानंतर देवगिरीला स्वातंत्र्याचा प्रकाश लाभला. शिवलिंगाच्या आकाराचा हा गड म्हणजे स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. 1500 वर्णांच्या सुखद व दुःखद घटनांनी न्हालेला, शेकडो पिढय़ांच्या हृदयांचे स्पंदन अनुभवलेला देवगिरीचा हा दुर्ग आपल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचा साक्षीदार आहे. अनंत प्रगट-अप्रगट तत्थ्यांचा संग्रह आपल्या उराशी बाळगून असलेला हा दुर्ग देशाची अनमोल संपत्ती आहे. त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे, हे विसरून चालणार



bout Author:

allmarathiinfo04 या ब्लॉगवर तुम्हाला निबंध, भाषण, अनमोल विचार, आणि वाचण्यासाठी कथा मिळेल. तुम्हाला काही माहिती लिहायचं असेल तर तुम्ही आमच्या ब्लॉगवर लिहू शकता.

Comments

Post a Comment

These website is not government he is private website.

Popular posts from this blog

मुरुड जंजिरा | Murud Janjira.

सिंधुदुर्ग | Sindhudurg Fort.

Independence day | भारतीय स्वातंत्र्य दिन