माझा आवडता खेळाडू निबंध मराठी 2023 | My Favourite Player Essay In Marathi
माझा आवडता खेळाडू निबंध मराठी| My Favourite Player Essay In Marathi
माझा आवडता खेळाडू निबंध मराठी
मला मैदानी खेळ खेळायला खूप आवडतात . Sachin हा जागतिक क्रिकेटमध्ये एक महान फलंदाज आहे . आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा तो एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे . हा त्याचा विक्रम कोणी मोडू शकला नाही . सचिन तेंडुलकर हा भारताचा एक महान खेळाडू मास्टर ब्लास्टर या उपाधीने नामांकित आहे .
मला क्रिकेट खेळण्यासोबतच क्रिकेट मॅच टीव्ही वर ती पाहण्याची आवड आहे . सचिन तेंडुलकरचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईमध्ये झाला . त्याची आई विमा व्यवसायीक होती तर वडील प्रख्यात कादंबरीकार होते . 1994 ते 1997 सचिनच्या कारकीर्दीची गौरवशाली वर्षे होती . त्या काळात जगाला आपल्या उत्कृष्ट खेळीने जगाचे मन जिंकले .
1998 हे वर्ष सचिनच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचे पाऊल ठरेल . त्या वर्षी त्याने क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या . सचिन तेंडुलकर यांच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले बनले आहेत . तो फक्त विक्रमासाठी नव्हे तर त्याचे विनम्र वागणे ह्या साठी सुद्धा ओळखला जातो . सचिन तेंडुलकर यांच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले बनले आहेत . तो फक्त विक्रमासाठी नव्हे तर त्याचे विनम्र वागणे ह्या साठी सुद्धा ओळखला जातो . म्हणूनच सचिन तेंडुलकर हा माझा आवडता खेळाडू आहे .
माझा आवडता खेळाडू निबंध मराठी | my favourite player essay in marathi.
सर्व मैदानी खेळा मधून क्रिकेट हा माझा आवडता खेळ आहे आणि भारतीय क्रिकेटचा देव मानला जाणारा उत्कृष्ट क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा माझा आवडता खेळाडू आहे . लहानपणापासून क्रिकेटमधील सचिन तेंडुलकरचा विक्रम मी पहात आहे . त्यामुळेच मला क्रिकेट खेळण्याची आवड निर्माण झाली आहे . एकदिवसीय क्रिकेटमध्ये सामन्यांमध्ये सर्वात जास्त शतक बनविणारे आणि सर्वात जास्त धावा करणारे यादीमध्ये सचिन तेंडुलकर चे नाव अग्रस्थानी आहे . सचिन तेंडुलकर चे पूर्ण नाव सचिन रमेश तेंडुलकर असे आहे.
शाळेत असताना सचिन हा खोडकर होता. इतरांसोबत भांडण्यासाठी दमदाटी करण्यासाठी मागेपुढे पाहत नसत . त्याचे लक्ष दुसरीकडे कधी वळवण्यासाठी त्याच्या मोठ्या भावाने त्याचे मन क्रिकेटमध्ये गुंतवण्याचे ठरवले सर्वप्रथम . त्याने सचिनला नामांकित क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडे पाठवले. रमाकांत आचरेकर हे दादरच्या शिवाजी पार्क येथे क्रिकेट शिकवायचे . सचिनच्या क्रिकेटमधील कौशल्य बघूनच आचरेकरांनी दादर मधील शारदाश्रम विद्यामंदिर हायस्कूल मध्ये सचिन ची भरती करण्यास सुचवले .जेणेकरून सचिनला क्रिकेट प्रशिक्षणात जास्त वेळ देता येईल. वयाच्या पंधराव्या वर्षी सचिन तेंडुलकरने मुंबई येथे त्याच्या होम ग्राऊंड वर 11 डिसेंबर 1988 रोजी पहिला सामना खेळला . त्या सामन्यात शतक ठोकणारा तो सर्वात युवा भारतीय फलंदाज होता. 2013 मध्ये सचिन तेंडुलकर याला भारत सरकारने भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न प्रदान केला .त्याआधी त्यांना पद्मश्री ,पद्मविभुषण ,अर्जुन पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे . 24 वर्षांच्या कारकिर्दीत सचिनला खूप वेळा जखमा झाल्या तरीही देशासाठी तो खेळत राहिला . भारतीय संघ विजयी करत राहिला . आयुष्यात येणाऱ्या अडचणीवर मात करून पुढे जाण्याचा धडा आपल्याला सचिन तेंडुलकर कडून मिळाला .पैसे मिळूनही त्याने त्या पैशाचा गर्व कधी केला नाही . या सर्व गुणांमुळेच सचिन तेंडुलकर हा माझा आवडता आणि आदर्श खेळाडू आहे.
माझा आवडता खेळाडू निबंध मराठी | my favourite player essay in marathi.
भारतीय क्रिकेटचा देव जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू पैकी एक भारताचा महान खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा माझा सर्वात आवडता खेळाडू आहे . सचिन तेंडुलकरचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईमध्ये झाला . सचिन चे पूर्ण नाव सचिन रमेश तेंडुलकर हे आहे . त्याचे वडील महाराष्ट्रातील प्रख्यात कादंबरीकार तर आई रजनी विमा व्यवसायीक होती , शालेय वयात तो नेहमी इतर मुलांबरोबर दमदाटी करायला कधीही मागे पुढे पाहत नव्हता .अशा वागणुकीमुळे भावाने त्याला क्रिकेटमध्ये गुंतवले .
त्याने क्रिकेटचे द्रोणाचार्य उत्तम प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडे सचिन क्रिकेटचे धडे घेण्यास पाठवले. आचरेकरांनी दादर मध्ये असलेल्या शारदाश्रम विद्यामंदिर हायस्कूल मध्ये सचिन ची भरती करण्यास सुचवले जेणेकरून सचिनला क्रिकेट या प्रशिक्षणात जास्तीत जास्त वेळ देता येईल . सचिनने शालेय क्रिकेटमध्ये उत्तम प्रदर्शन दाखवले . वयाच्या पंधराव्या वर्षी तो मुंबई येथे त्याच्या होम ग्राऊंड वर 11 डिसेंबर 1988 रोजी पहिला सामना खेळला . तो प्रदार्पण सामन्यात शतक ठोकणारा सर्वात लहान भारतीय फलंदाज ठरला . 1994 -1997 या काळात सचिन ने जगाला आपल्या उत्कृष्ट खेळ दाखवून सर्व क्रिकेटप्रेमींच्या मनावर राज्य केले .
वर्ष 1998 सचिनच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचे पाऊल ठरले या वर्षी त्यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत सर्वाधिक धावा केल्या . आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे . सचिनच्या नावावर आगळावेगळा विक्रम आहे तो म्हणजे तो असा एकमेव खेळाडू आहे ज्याला टीम हरलेली असताना देखील सहा वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला आहे. उजव्या हाताने खेळ आणि डाव्या हाताने लिखाण ही सचिनची बाब नेहमीच कौतुकाचा विषय ठरते.
2013 मध्ये सचिनच्या क्रिकेट विश्वातील अजोड कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्याला देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न प्रदान केला. यापूर्वी त्याला राजीव गांधी खेलरत्न ,पद्मश्री पुरस्कार ,पद्मविभूषण पुरस्कार ,अर्जुन पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे . सचिन हा जागतिक क्रिकेटमधील एक महान फलंदाज आहे त्याच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत . भारतीयांकडून क्रिकेटचा देव म्हणून घेतल्यानंतरही सचिन ने अहंकार कधी दाखवला नाही .
24 वर्षाच्या त्याच्या कारकिर्दीत त्याला खूप वेळा जखमा झाल्या त्या सर्वांची झुंजतो देशासाठी खेळत राहिला आदर्श महान खेळाडू बनला. सचिन हयात समर्पण आणि त्याग दिसतो . सचिन कडून मी खूप काही शिकले आहेत . आयुष्यात चढ-उतार येत राहतात अशा परिस्थितीत खचून न जाता आपण आपले काम करत राहा , आपल्याला नक्कीच यश मिळते हे मला सचिन तेंडुलकरने शिकवले .क्रिकेट जगात सचिन वर मी खूप प्रेम करते . क्रिकेटमधून जाहिरातीमधून त्यांनी खूप पैसाही कमावला पण त्याचा कधी गर्व केला नाही . सचिन तेंडुलकरच्या या सार्या गुणांमुळे तो माझा आवडता खेळाडू क्रिकेटपटू आणि खरा आदर्श बनला आहे.
Comments
Post a Comment
These website is not government he is private website.