माझा आवडता शिक्षक निबंध / My Favorite Teacher Essay.

 माझा आवडता शिक्षक निबंध / My Favourite Teacher Essay.


शिक्षक ही अशी व्यक्ती आहे जी ज्ञान, मूल्ये, सद्गुण प्रदान करते आणि शाळेत विद्यार्थ्यांना प्रेरणा देतात. एक शिक्षक आपल्या जीवनात गुरु, पालक, शिक्षण प्रशिक्षक, आणि मार्गदर्शक अशा अनेक उल्लेखनीय भूमिका बजावतो आणि आपल्याला जीवनातील यशाचा मार्ग धाकवतात.

     माझ्या आवडत्या शिक्षकाचे नाव नाडेकर सर.ते माझे वर्गशिशक आणि रोज आमची हजेरी घेतात.त्यांचे व्यक्तिमत्व कठोर असले तरी ते स्वभावाने खूप काळजी घेणारे आणि दयाळू आहेत.ते खूप शिस्तप्रिय आणि वक्तशीर आहे आणि नेहमी वेळेवर आमच्या क्लास मधे येतात.ते आम्हाला गणित विषय शिकवतात आणि अनेक मनोरंजक कथा सांगतात.आम्ही दररोज आमच्या वर्गात येण्यापूर्वी आणि बाहेर जाण्यापूर्वी माझे शिक्षक आम्हाला प्रेमाने आवाज देतात.शाळेतील कोणत्याही कार्यक्रमात किंवा स्पर्धेदरम्यान ते आम्हाला खूप चांगले मार्गदर्शन करतात.ते आम्हाला अभ्यास करायला शिकवतात आणि आमच्या वर्गमित्रांमध्ये गोष्टी सामायिक करायला शिकवतात आणि आम्हाला दररोज खूप गृहपाठ देत नाहीत.ते आम्हाला आमच्या अभ्यासात मदत करतात.आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी हा एक मनोरंजक शिकण्याचा अनुभव बनवतात.माझे वर्ग शिक्षक हे मार्गदर्शकासारखे आहेत जे आम्हाला नियमितपणे आमच्या अभ्यासात चांगले करण्यास प्रवृत्त करतात.

माझे आवडते शिक्षक मराठी निबंध my favourite teacher essay in Marathi ( ३०० शब्दात )

प्रत्येक व्यक्तीच्या मनात शिक्षकाचे विशेष स्थान असते. प्रत्येक व्यक्ती शाळेत शिक्षकाकडून मिळालेली शिदोरी आयुष्यभर आपल्यासोबत वागवत असतो. प्रत्येक शिक्षक आपला विद्यार्थी एक आदर्श विद्यार्थी बनावा यासाठी प्रयत्न करत असतो. त्यासाठी ते शिक्षक त्या विद्यार्थ्यावर सर्व संस्कार करत असतो.

त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थी जीवनाचा शिल्पकार म्हणून ओळखले जाते. खरंच शिक्षक हे विद्यार्थांच्या जीवनाचे शिल्पकार असतात. कारण विद्यार्थांच्या यशामध्ये शिक्षकाचा मोलाचा वाटा असतो.

माझ्याही आयुष्यात असेच एक शिल्पकार शिक्षक माझ्यासाठी आदर्श आहेत. त्यांचं नाव श्री नाडेकर सर आहे. ते आम्हाला इयत्ता दहावीच्या वर्गाला गणित शिकवायचे. त्यांनी लावलेली आम्हाला शिस्त आणि आमच्यावर केलेले संस्कार आजही मला भावी आयुष्यात खूप महत्वाचे ठरत आहेत.

माझे आवडते शिक्षक मराठी निबंध my favourite teacher essay in mrathi (५०० शब्दात)

मी जनता विद्यालय टेंभे वरचे शाळेत आहे. माझी शाळा खूपच सुंदर आहे आणि शाळेतील सर्व शिक्षक देखील खूपच प्रेमळ आहेत. ते खूपच छान शिकवतात.

मला माझ्या शाळेतील सर्व शिक्षक आवडतात पण श्री राजेंद्र नाडेकर सर हे मला सर्वात जास्त आवडतात. ते सर्वात जास्त आवडण्याचे कारण ही तसेच आहे. नाडेकर सर  आम्हाला गणित हा विषय शिकवतात. गणित शिकवण्याची त्यांची शैली फारच उत्तम आहे. त्यांनी शिकावलेलं गणित मला लगेच समजत.

श्री नाडेकर सर हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील आहेत पण त्यांची नौकरी इथे आमच्या शाळेत असल्यामुळे ते आमच्याच शहरात किरायाने राहतात. त्यांना दोन मुले आणि एक छोटीशी मुलगी आहे. त्यांचे वय जवळपास ४०-४५ च्या आसपास असावे.

श्री नाडेकर सरांचा स्वभाव खूपच कडक आहे. ते फारच कडक शिस्तीचे आहेत. त्यांना वर्गात शिकवताना अत्यंत शांत वातावरण लागते. वर्गात शिकवताना जर कुणी विद्यार्थी बोलत असेल तर सर त्याला लगेच शिक्षा करतात शिवाय खूप रागावतात देखील. त्यामुळे गणिताच्या तासाला बोलण्याची कुणाचीही हिंमत होत नाही. सर्व विद्यार्थी अगदी शांतपणे गणिते समजून घेतात.

असे असले तरीही श्री नाडेकर सरांच्या तासाला कधीच कंटाळा येत नाही. कारण त्यांची गणित शिकवण्याची शैलीच अशी आहे की अगदी कंटाळवाणा वाटणारा गणित विषय देखील तळागाळातील विद्यार्थांना समजतो. शिवाय ते गणित शिकवताना बोर होऊ नये म्हणून मध्ये मध्ये विनोदी चुटकुले देखील सांगत असतात.

मी मात्र सरांचा नेहमीच आवडता विद्यार्थी असे. कारण सरांनी फळ्यावर दिलेले कोणतेही गणित मी वर्गात सर्वात पहिले सोडवून दाखवत असे. तसेच सरांनी दिलेला गृहपाठ देखील सर्वात अगोदर पूर्ण करीत असे.

गणिताची तयारी चांगली व्हावी आणि प्रत्येक मुलगा गणितात पास व्हावा यासाठी सर खूप प्रयत्न करीत असतात. त्यासाठी ते आमचे एक्स्ट्रा क्लास घेऊन गणिताचा सराव करून घेतात. शिवाय खूप सारे गणिते गृहपाठ देखील देतात. सर्वांना तो गृहपाठ पूर्ण करावाच लागतो.

जर एखाद्या विद्यार्थ्याने गृहपाठ केला नाही तर श्री नाडेकर सर शिक्षा तर करतातच पण त्याला एक दिवस त्यांच्या तासिकेला देखील बसू देत नाहीत. कारण त्यांचे मत असते की, ” मी जर एवढं जीव तोडून शिकवत असेल तर तुम्हाला देखील मेहनत घ्यावी लागेल, मी सांगेल तेव्हढा गृहपाठ पूर्ण करावाच लागेल.”

श्री नाडेकर सर गणित विषयामध्ये शाळेला नेहमीच १००% निकाल मिळवून देतात. मागच्या वर्षी त्यांच्या दोन दहावीच्या विद्यार्थांना गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले होते आणि दहावीचे सर्व विद्यार्थी देखील गणित विषयात पास झाले होते. त्यामुळे त्यांचा शाळेत सत्कार करण्यात आला होता.

या वर्षीही शाळेला गणित विषयात १००% निकाल मिळवून देणार अशी त्यांनी आमचे मुख्यद्यपक श्री पवार सर यांना ग्वाही दिली आहे. त्यासाठी ते खूप मेहनत घेत आहेत.

सरांची एक विशेष बाब म्हणजे सर कधीही समोर बसणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांना जास्त लक्ष देत नाहीत. सरांचे सर्वात जास्त लक्ष मागच्या बाकावर बसणाऱ्या विद्यार्थ्याकडे असते. कारण सरांचे असे मत आहे की समोर बसणारे विद्यार्थी अगोदरच हुशार असतात. ते सांगितलं तेव्हढा गृहपाठ वेळेवर करतात. त्यामुळे त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता नसते.

पण जे विद्यार्थी मागच्या बाकावर बसतात. त्यांच्याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे असते. कारण नापास होण्याची त्यांची शक्यता असते. म्हणून सर मागच्या बाकावर बसणाऱ्या विद्यार्थांना अगदी त्यांच्या जवळ जाऊन गणित समजून सांगतात. त्यांना समजल्याशिवाय सर पुढचा भाग देखील घेत नाहीत.

त्यामुळेच सरांच्या वर्गातील सर्व विद्यार्थी गणित विषयात पास होतात आणि शाळेला १००% निकालही मिळवून देतात.

सर वर्गातील सर्वांना बरोबर घेऊन चालतात. त्यांची ही बाब मला सर्वात जास्त चांगली वाटते. शिवाय त्यांच्यामुळे माझा गणिताचा पाया देखील खूप पक्का झाला आहे.

मी पूर्वी गणित विषयात अगदी साधारण होतो पण आज मला सरांमुळे कोणतेही गणित सुटते. त्यामुळे श्री नाडेकर सर मला खूप आवडतात. ते सर्व विद्यार्थांना गणित हा कंटाळवाणा वाटणारा विषय अगदी सहज समजावा म्हणून खूप मेहनत घेतात.



 About Author:

या ब्लॉगवर तुम्हाला निबंध, भाषण, अनमोल विचार, आणि वाचण्यासाठी कथा मिळेल. तुम्हाला काही माहिती लिहायचं असेल तर तुम्ही आमच्या ब्लॉगवर लिहू शकता.

Comments

Popular posts from this blog

मुरुड जंजिरा | Murud Janjira.

सिंधुदुर्ग | Sindhudurg Fort.

Independence day | भारतीय स्वातंत्र्य दिन