माझा आवडता शिक्षक निबंध / My Favorite Teacher Essay.
माझा आवडता शिक्षक निबंध / My Favourite Teacher Essay. शिक्षक ही अशी व्यक्ती आहे जी ज्ञान, मूल्ये, सद्गुण प्रदान करते आणि शाळेत विद्यार्थ्यांना प्रेरणा देतात. एक शिक्षक आपल्या जीवनात गुरु, पालक, शिक्षण प्रशिक्षक, आणि मार्गदर्शक अशा अनेक उल्लेखनीय भूमिका बजावतो आणि आपल्याला जीवनातील यशाचा मार्ग धाकवतात. माझ्या आवडत्या शिक्षकाचे नाव नाडेकर सर. ते माझे वर्गशिशक आणि रोज आमची हजेरी घेतात. त्यांचे व्यक्तिमत्व कठोर असले तरी ते स्वभावाने खूप काळजी घेणारे आणि दयाळू आहेत. ते खूप शिस्तप्रिय आणि वक्तशीर आहे आणि नेहमी वेळेवर आमच्या क्लास मधे येतात. ते आम्हाला गणित विषय शिकवतात आणि अनेक मनोरंजक कथा सांगतात. आम्ही दररोज आमच्या वर्गात येण्यापूर्वी आणि बाहेर जाण्यापूर्वी माझे शिक्षक आम्हाला प्रेमाने आवाज देतात. शाळेतील कोणत्याही कार्यक्रमात किंवा स्पर्धेदरम्यान ते आम्हाला खूप चांगले मार्गदर्शन करतात. ते आम्हाला अभ्यास करायला शिकवतात आणि आमच्या वर्गमित्रांमध्ये गोष्टी सामायिक करायला शिकवतात आणि आम्हाला दररोज खूप गृहपाठ देत नाहीत. ते आम्हाला आमच्या अभ्यासात मदत करतात.आण...