करोना | Carona.
नमस्कार मित्रांनो , allmarathiinfo04 मध्ये आपले स्वागत आहे आजच्या लेखामध्ये आपण 'करोना' नंतरचे जग या विषयावर माहिती बघणार आहोत. Allmarathiinfo04 विश्वविधात्याने अतिशय सुंदर जग निर्माण केले.त्याने ते निर्माण करतांना सजीव आणि निर्जीव, तसेच डोळ्यांनी दिसणारी आणि न दिसणारी सृष्टी निर्माण केली. न दिसणारे लहान लहान जीव, सजीव असो वा निर्जीव साऱ्यांना घातक ठरतात.पण काही उपयोगी देखील असतात. असाच एक सुक्ष्मजीव ज्याला आपण कोव्हिड-१९ असे म्हणत आहोत त्याने जगभरात अगदी उच्छाद मांडला आहे. हा विषाणू एवढ्या झपाट्याने वाढत आहे की त्याला आवर कसा घालावा तेच कळत नाही.काही देशांनी तर अक्षरशः हात टेकले आहेत. तसे बघितले तर कोरोना विषाणुचा इतिहास नऊ दशकांचा आहे.१९३०च्या दशकात हा विषाणू प्राण्यांमध्ये आढळला. नंतर १९६०च्या सुमारास तो मानवी श्वसन संस्थेत संसर्गरोग निर्माण करणारा घटक आहे असे समजले. पण तत्कालीन तांत्रिक मर्यादेमुळे त्याचा बारकाईने अभ्यास होऊ शकला नाही. तो पुन्हा २००३ मध्ये सार्स या स्वरुपात प्रकटला तेव्हा तो वटवाघुळात आणि मानवात आढळला नंतर २०१३ मध्ये मार्स कोरोना विषाणू सौदी...